१० हजारांची लाच स्वीकारताना तलाठी लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात
उस्मानाबाद : लोकसेवक रविंद्र दत्तात्रय अंदाने, वय 55 वर्षे, तलाठी, सज्जा सावरगाव अतिरिक्त कार्यभार - केमवाडी सज्जा ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद (वर्ग - 3) यांनी तक्रारदार यांच्या मालकीच्या शेतजमिनीची संमतीपत्रा प्रमाणे पत्नी व मुलाच्या नावे फेर फारला (खातेफोड) नोंद घेण्यासाठी प्रथम १५ हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती १० हजाऊ रुपये लाच स्वीकारण्यास संमती देऊन १० हजार रुपये लाचरक्कम पंचांसमक्ष स्वीकारली आहे सदरची कारवाई आज दि. २ मार्च रोजी दुपारी दोन वाजून १६ मिनिटे वाजताच्या सुमारास तलाठी कार्यालय,सावरगाव येथे करण्यात आली आहे. याबाबत पोलीस ठाउ तामलवाडी येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. अशी माहिती ला.प्र.विभागाने दिली आहे.
हि कारवाई सापळा अधिकारी :- प्रशांत संपते,पोलीस उप अधीक्षक ला.प्र.वि.उस्मानाबाद यांनी संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद , विशाल खांबे,अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. औरंगाबाद, यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथक पो.अंमलदार दिनकर उगलमुगले, शेख, विष्णू बेळे, झाकीर काझी यांच्या पथकाने कारवाई केली आहे
भ्रष्टाचारा संबंधित काही तक्रार असल्यास खालील ठिकाणी संपर्क साधावा टोल फ्री क्र:- 1064 अथवा प्रशांत संपते,पोलीस उप अधीक्षक ला.प्र.वि.उस्मानाबाद
मो.नं.9527943100 , संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद. मो. नं.9923023361
मा.विशाल खांबे,अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. औरंगाबाद. मो.नं. 8788644994 आवाहन करण्यात आले आहे