पालकमंत्री सावंत यांनी निभावली दातृत्वाची भूमिका

0

पालकमंत्री सावंत यांनी निभावली दातृत्वाची भूमिका

ईट दि.२२ (प्रतिनिधी) - मानवी जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्तीस वेगवेगळ्या प्रकारच्या मदततीची नितांत आवश्यक असते. मात्र ती मदत कोणत्या स्वरूपाची लागणार व मिळणार आहे ? हे वेळ आणि काळ ठरवत असतो. असाच प्रकार एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीस कॅन्सर आजाराची लागण झाल्यानंतर उपचारासाठी त्यास आर्थिक मदतीची नितांत गरज होती. मात्र जवळ पैसे नसल्यामुळे पुढील उपचार कसे करायचे ? या युवाने परिवार सापडला होता. अशा अडचणीत सापडलेल्या कॅन्सरग्रस्त रुग्णासाठी आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत धावून पुढे आले. त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ती आर्थिक मदत उपलब्ध करून दिली असल्यामुळे सावंत यांचे दातृत्व पुन्हा जनतेसमोर आले आहे. 
भूम तालुक्यातील ईट येथील राजेंद्र भागवत यांना कॅन्सरची लागण झाल्यामुळे उपचारासाठी ४ लाख रुपयांची आवश्यकता होती. मात्र उपचारासाठी ४ लाख रुपये खर्च करण्याची ऐपत नसलेल्या भागवत यांनी अनेकांकडे मदतीची याचना केली. परंतू मदत मिळण्यास अनेक अडचणी येऊ लागल्या. ही बाब ईट येथीलच प्रवीण देशमुख यांना राजेंद्र भागवत यांचा मुलगा प्रेम यांनी सांगितल्यानंतर देशमुख यांनी याबाबत पालकमंत्री सावंत यांच्याशी फोनद्वारे‌ संपर्क साधून हा सर्व प्रकार कथन केला. तर पालकमंत्री सावंत यांनी मदत मिळवून देण्याचे आश्वासन देऊन रवींद्र अनभुले यांना याबाबत पाठपुरावा करण्याचे सांगितले. त्याप्रमाणे अनुभुले यांनी भागवत यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रस्ताव पाठवून त्या माध्यमातून ७५ हजार रुपयांची मदत उपलब्ध करून दिली आहे. जर भागवत यांनी पालकमंत्री सावंत यांच्याशी संपर्क साधला नसता तर ही मदत मिळणे दुरापास्त झाले असते. तर भागवत यांनी वेळेवर संपर्क केल्यामुळे पालकमंत्री सावंत हे देखील भागवत यांच्या मदतीसाठी धावून आल्याने भागवत कुटुंबाला देखील सर्वात मोठा आरोग्यदायी आधार मिळाला आहे. त्यामुळे मंत्री सावंत यांची दातृत्व वृत्ती अनेकांना कळून चुकली असून त्यांच्या दातृत्व वृत्तीचा अनेकांना परिचय वेगवेगळ्या माध्यमातून आला व येत आहे तसेच यापुढेही येतच राहणार. विशेष म्हणजे अडीअडचणीत सापडलेल्या गरीब, निराधार व वंचित लोकांना मदतीसाठी सावंत यांचे हात सतत पुढे येत असल्याचे यामुळे पुन्हा सिद्ध झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top