आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त निपाणी येथील शालेय साहित्य वाटप
भुम : महाराष्ट्र राज्याच्या आरोग्यमंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे श पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्ताने उपजिल्हाप्रमुख दत्ता बापू मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुकाप्रमुख तथा माजी उपसभापती बालाजी बापू गुंजाळ यांच्या स्वखर्चातून संपूर्ण भूम तालुक्यात शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी जि प कें प्रा शाळा निपाणी ता.भूम येथे शाळेचे मुख्यद्यापक आंधळे , शिक्षक शिंदे सर,कावळे सर व गावातील नागरिक जयराम भोसले, अविनाश अनभुले,अतुल लोंढे, अतुल अनभुले,आशिष राऊत,उमेश खंदारे यांच्या उपस्थितीत शालेय साहित्य वाटप करण्यात आले.