भैरवनाथ साखर कारखान्यावर पार पडली आरोग्य मित्र कार्यशाळा

0

भैरवनाथ साखर कारखान्यावर पार पडली आरोग्य मित्र कार्यशाळा 

उस्मानाबाद दि.१९ (प्रतिनिधी) - परंडा तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ साखर कारखान्यावर पालकमंत्री यांच्या आदेशानुसार आरोग्य मित्र कार्यशाळा दि.१९ मार्च रोजी घेण्यात आली. 
या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा भैरवनाथ कारखान्याचे संचालक धनंजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, परंडा तालुकाप्रमुख आण्णासाहेब जाधव, माजी सभापती सतीश दैन, महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख ताई लांडे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुकाप्रमुख बालाजी नेटके, भूम तालुकाप्रमुख पांडुरंग धस, आनाळाचे सरपंच कल्याण शिंदे व धनंजय खैरे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना डॉ. डोलारे, डॉ.अनभुले, डॉ. निंबाळकर, डॉ आब्रोर पठाण, डॉ कुलकर्णी आदींनी उपस्थितांना महात्मा फुले योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व इतर योजनेची सविस्तर माहिती देत मार्गदर्शन केले. यावेळी परंडा तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, आरोग्य मित्र संघटनेचे पदाधिकारी व आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top