उस्मानाबाद वैद्यकीय महाविद्यालयात निष्काळजीपणाचा कळस! आरोग्य मंत्री कारवाई करणार का? , x-ray

0





उस्मानाबाद वैद्यकीय महाविद्यालयात निष्काळजीपणाचा कळस! आरोग्य मंत्री कारवाई करणार का?

उस्मानाबाद : वैद्यकीय महाविद्यालयात निष्काळजीपणाचा कळस समोर आला आहे. १६ मार्च २०२३ रोजी फिरदोस साबिर शेख ,  वय ६ वर्षाच्या मुलीला वैद्यकीय महाविद्यालय उस्मानाबाद ( जिल्हा रुग्णालय) येथे घशामध्ये खव खव ( त्रास ) होत असल्या मुळे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासणी करून एक्सरे ( x-ray ) काढण्याची सांगितले व नातेवाईक यांनी रुग्णालयात एक्सरे ( x-ray ) केले. व एक्सरे ( x-ray ) करणार्या कर्मचाऱ्यांनी एक्स-रे करण्याच्या नियमाचे उल्लंघन करत एक्स-रे केले व सरळ  दाखवत होते की शरीरात "चैन रनर" आहे. 

लहान मुलीच्या नातेवाईकांनी तो रिपोर्ट डॉक्टरांना दाखविला व डॉक्टर आणि तात्काळ सोलापूरला पेशंट रेफर करण्यासाठी सांगितले व रुग्णालयाच्या वतीने  रुग्णवाहिका देखील करून देण्यात आली त्यावेळेस लहान मुलीच्या नातेवाईकांची तारांबळ उडाली लहान मुलीच्या शरीरात "चैन रनर" गेला कुठण विचार करत होते. सोलापूर येथे लहान मुलीला ऍडमिट करून घेण्यात आले व प्रथम त्या ठिकाणी एक्स-रे  ( x-ray ) काढण्यात आले त्याच वेळीच डॉक्टरांच्या लक्षात आले की लहान मुलीच्या शरीरात काही नसून एक्स-रे  ( x-ray ) करणाऱ्याच्या चुकीमुळे हा सर्व गोंधळ उडाला आहे. उस्मानाबाद येथील रुग्णालयातील एक्स-रे ( x-ray ) करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मुलीच्या अंगातील ड्रेस न काढता एक्स-रे केल्यामुळे एक्स-रे ( x-ray )  मध्ये दिसणारी "चैन रणर" दिसत असल्याचे सोलापूर येथील रुग्णालयातील डॉक्टरांच्या लक्षात आल्याने त्यांनी त्या लहान मुलीच सोलापूर येथून परत उस्मानाबादला पाठविले आहे.

या घडलेल्या सर्व प्रकारामुळे उस्मानाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालय ( जिल्हा रुग्णालय ) येथील एक्स-रे   ( x-ray ) करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणा समोर दिसून येत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यावर , कर्मचाऱ्यावर , कारवाई होणार का? , विषेश आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यांमध्ये हा प्रकार घडल्याने आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री डॉ प्रा तानाजी सावंत याकडे लक्ष देऊन काय कारवाई का? याकडे उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे. 

उस्मानाबाद येथे रुग्णालयात केलेला एक्स रे


सोलापूर येथे केलेले एक्सप्रेसचा फोटो ..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top