उस्मानाबाद न.प स्वच्छता विभाग ॲक्शन मोड मध्ये

0

उस्मानाबाद न.प स्वच्छता विभाग ॲक्शन मोड मध्ये

उस्मानाबाद : मागील काही महिन्यापासून शहरात स्वच्छता होत नसल्याबाबत नगरपालिका प्रशासनाकडे अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या तक्रारी लक्षात घेत नगरपालिका मुख्याधिकारी वसुधा फड यांनी नगरपालिका स्वच्छता विभागाला धारेवर धरत शहरातील स्वच्छता वाढवली आहे. त्यामुळे सध्या शहरातील स्वच्छता दिसून येत असून नगरपालिका स्वच्छता विभाग ॲक्शन मोडमध्ये आल्याची चर्चा नागरिकातून होत आहे.

काही दिवसापूर्वी स्वच्छता कॉन्ट्रॅक्टरने नागरिकांना तक्रारीसाठी स्वतःचा नंबर वायरल केला होता. तसेच अजुन ही आलेल्या तक्रारीचे तात्काळ निवारण करण्यात येत आहे. तसेच पावसाळ्याच्या पूर्व संदेला शहरातील सर्व ठिकाणच्या नाल्या स्वच्छता करण्याचें काम सुरू आहे. शहरातील सर्व प्रभागांमध्ये घंटागाड्यांचे कचरा संकलन फेरा देखील वाढविण्यात आले आहेत.  माननीय मुख्याधिकारी वसुंधरा फड यांचे स्वच्छता विभागाकडे विशेष लक्ष असून शहरातील नागरिकांच्या तक्रारीचे निवारण  मुख्याधिकारी स्वतः करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top