सार्वजनिक आरोग्य विभागाचे माजी महासंचालक डॉ.सुभाषजी साळुंखे यांच्या वाढदिवस साजरा

0

मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाचे माजी महासंचालक डॉ.सुभाषजी साळुंखे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक २३ एप्रिल २०२३ रोजी जनसेवा फाउंडेशन संचलित अनाथ निराधार पुनर्वसन केंद्र येथे सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमांमध्ये अनाथ निराधार वंचित व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील सुमारे 300 विद्यार्थ्यांनी करिता सुसज्ज नवीन वसतीगृह इमारतीस आणि सध्याच्या अनाथ निराधार पुनर्वसन वसतिगृहास आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी भेट दिली.

जनसेवा फाउंडेशन तर्फे संचलित या अनाथ वृद्धांसाठी चाललेल्या सत्कार्यास फुल न फुलाची पाकळी म्हणून जेएसपीएम फाउंडेशन तर्फे रुपये पाच लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

डॉक्टर सुभाष जी साळुंखे यांचा आरोग्य विभागात मोठे योगदान आहे. कोविड काळातही त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा राज्य सरकारला झाला आहे. त्यांना निरोगी सुख संपन्न आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असे मत राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी व्यक्त केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top