२६ एप्रिल रोजी कानेगाव बाहेरुन येणा-या व्यक्तींना गावात येण्याकरीता प्रतिबंध लागू

0

२६ एप्रिल रोजी कानेगाव बाहेरुन येणा-या व्यक्तींना गावात येण्याकरीता प्रतिबंध लागू 

 कानेगाव :  लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनांक २६.०४.२०२३ रोजी असल्याने सदरचे वेळी गावामध्ये ताणवपुर्ण वातावरण असल्याने जयंती मिरवणुक दरम्यान तालुक्यातील व बाहेरील जयंतीसाठी येणारे लोकांनी जयंती मिरवणुक दरम्यान अज्ञात इसमाने आक्षेपार्य घोषणा, आक्षेपाहर्यं कृती केल्यामुळे मिरवणुकी दरम्यान दंगल निर्माण होवुन कायदा व सार्वजनिक सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने कानेगाव येथे बाहेरून येणा-या व्यक्तींना गावात येण्याकरीता प्रतिबंध करणे आवश्यक असल्याने मौ कानेगाव येथील गावात सीआरपीसी १४४-२ प्रमाणे मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत.

 पोलीस निरीक्षक लोहारा यांच्या शिफारशीवरून फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १४४ अन्वये , गणेश पवार, उपविभागीय दंडाधिकारी, उमरगा,  कानेगाव ता. लोहारा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दिनांक २६.०४.२०२३ रोजी कानेगाव येथील ग्रामस्थ वगळून बाहेरून येणा-या व्यक्तीना गावात प्रवेश करण्याकरीता फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४-२ अन्वये मनाई आदेश जारी केले. तथापि सदर कायदा व सार्वजनिक सुव्यवस्था राखणेकामी आवश्यक शासकीय व निमशाकीय अधिकारी / कर्मचारी यांना आदेशातून सुट देण्यात येते तसेच मौ.कानेगाव ता. लोहारा येथील ग्रामस्थ यांनी वेळोवेळी पोलीस विभागाने दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड विधान कायद्याचे कलम १८८ प्रमाणे दंडनीय कारवाईस पात्र राहतील. असे आदेश उपविभागीय दंडाधिकारी यांनी काढले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top