मनरेगा अंतर्गत उस्मानाबाद पं.स.मध्ये भौतिक व आर्थिक अनियमिततेस जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे राहुल गुप्ता यांचे निर्देश

0

मनरेगा अंतर्गत उस्मानाबाद पं.स.मध्ये भौतिक व आर्थिक अनियमिततेस जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे राहुल गुप्ता यांचे निर्देश

         उस्मानाबाद,दि.25( प्रतिनिधी ):- महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत उस्मानाबाद पंचायत समितीमध्‍ये 2021-22 आणि 2022-23 मध्‍ये झालेल्‍या सार्वजनिक तसेच वैयक्तिक कामांमध्‍ये झालेल्‍या भौतिक व आर्थिक अनियमिततेच्‍या अनुषंगाने जिल्‍हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या निर्देशानुसार जि.प.चे अतिरिक्त मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्‍यक्षतेखाली इतर 04 सदस्‍यांसह चौकशी समिती गठीत करण्‍यात आली होती. या चौकशी समितीने दि. 18 एप्रिल 2023 रोजी जिल्‍हाधिकारी यांना चौकशी अहवाल सादर केला आहे.  
          या चौकशी अहवालाच्‍या अनुषंगाने चौकशी  करण्‍यात आलेल्‍या कामांपैकी 24 कामांमध्‍ये आर्थिक अनियमितता आढळून आली असून यामध्‍ये हजेरीपटांवरील मजूरांची मजूरी त्‍यांचे वैयक्तिक खात्‍यावर जमा न होता इतरांच्‍या खात्‍यावर एकूण रक्‍कम  63 लाख 77 हजार 767 रुपये जमा झाली असल्‍याचे निदर्शनास आले आहे.  
         तसेच  गटविकास अधिकारी, पंचायत समिती, तुळजापूर, उमरगा, लोहारा, भूम, परंडा व वाशी यांच्या मार्फत उस्मानाबाद पंचायत समिती मधील कामांची प्रत्‍यक्ष स्‍थळ पाहणी करण्‍यात आली आहे. त्‍यांनी सादर केलेल्‍या अहवालाच्‍या अनुषंगाने एकूण 17 कामांमध्‍ये मुल्‍यांकनापेक्षा जास्‍तीचा खर्च रक्‍कम 19 लाख 45 हजार 51 रुपये   एवढा झाला असल्‍याचे निदर्शनास आले आहे. 
            त्‍या अनुषंगाने दि. 01 एप्रिल 2021 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीमध्‍ये कार्यरत असलेल्‍या जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून रक्‍कम वसूल का करण्‍यात येऊ नये याबाबत त्‍यांना कारणे दाखवा नोटीस 6 (3) देऊन त्‍यांचा खुलासा मागविण्‍यात आला असून प्रकरणात जबाबदार असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याबाबत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी निर्देश दिले आहेत.   
*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top