साळुंखे नगर येथील हनुमान मंदिरात कलशारोहन सोहळा उत्साहात

0
साळुंखे नगर येथील हनुमान मंदिरात कलशारोहन सोहळा उत्साहात

 उस्मानाबाद, दि. 9 -
शहरातील साळुंखे नगर येथील हनुमान मंदिरात मोठ्या भक्तिमय वातावरणात गुरुवारी कलशारोहन सोहळा पार पडला. पहाटे पाच वाजेपासून सुरू झालेल्या या कार्यक्रमाला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

प्रारंभी धार्मिक विधिनुसार कलशाचे पूजन व अभिषेक करण्यात आला. कलशाची अभिषेक पूजा दहा दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर मोठ्या उत्साहात परिसरातून कलशाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत माताभगिनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्या होत्या. दिंडेकरी, टाळकरी, डोक्यावर तुळस घेतलेल्या महिला यामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. मिरवणुकीनंतर हभप. सुधाकर महाराज इंगळे यांच्या हस्ते मंदिराच्या शिखरावर कलशारोहन करण्यात आले.

यावेळी सुधाकर महाराज इंगळे यांचे सुश्राव्य हरिकीर्तनही आयोजित करण्यात आले होते. हरिकीर्तनानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसाद ठेवण्यात आला होता. कार्यक्रमासाठी साळुंखे नगर, बालाजी नगर आणि परिसरातील लहान-थोर भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश शिंदे, आप्पा कोळपे, मनोज शेरकर, रवींद्र केसकर, गोविंद इंगळे, विजय भोसले, अनिल गिरवलकर, अभय पाथरूडकर, अरुण माने यांच्यासह साळुंके नगरमधील रहिवाशी बांधवांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top