त्रिविक्रम मंदिराच्या जिर्णोदारासाठी रु २ कोटी ९० लक्ष रुपयांचा निधी मंजूर - आ. राणाजगजितसिंह पाटील

0

त्रिविक्रम मंदिराच्या जिर्णोदारासाठी रु २ कोटी ९० लक्ष रुपयांचा निधी मंजूर - आ. राणाजगजितसिंह पाटील 

स्थापत्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातील वैशिष्ट्यपूर्ण व ऐतिहासिक दृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या तेर येथील त्रिविक्रम मंदिराच्या जतन व दुरुस्तीसाठी रु २ कोटी ९० लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी दिली आहे. 

त्रिविक्रम मंदिर हे राज्य संरक्षित स्मारक असून महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन इष्टिका मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिराच्या स्मारकास मोठे तडे गेले असून मंदिराच्या जतन व दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून घेण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराला यश आले असून पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून या कामासाठी रु २ कोटी ९० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

सांस्कृतिक व ऐतिहासिक दृष्ट्या तेरला अनन्यसाधारण महत्त्व असून पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट च्या सौजन्याने मे. अजिंक्यतारा कन्सल्टंट च्या माध्यमातून संपूर्ण गावचा विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे. या आराखड्यानुसार विविध विभागांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून घेण्यात येत आहे. या पूर्वी संतश्रेष्ठ गोरोबा काका मंदिर व परिसर विकासासाठी जवळपास रु ७ कोटी मंजूर करून घेण्यात आले आहेत. या निधी मधून भक्त निवासाचे अर्थवट बांधकाम पूर्ण करण्यात येणार असून मंदिर परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुराणवास्तू संग्रहालयाचे काम देखील सुरू आहे. 

त्रिविक्रम मंदिराच्या गर्भगृहाच्या छतास व भिंतीस ग्राऊंटींग करणे, कायमस्वरूपी विद्युत योजना व सुशोभीकरण करणे, मंडपाच्या सर्व भिंतींना आतून व बाहेरून करण्यात आलेला गिलावा पूर्णपणे जीर्ण झाला असल्यामुळे पुनः नव्याने करणे, मंदिराच्या छतास भेगा पडल्यामुळे पाण्याची गळती रोखण्यासाठी गळती प्रतिबंधक योजना करणे या कामांचा समावेश आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top