उस्मानाबाद तालुक्यातील पोहनेर येथील भाजपाचे रोहन देशमुख व बेंबळी येथील आकाश मुंगळे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षात प्रवेश घेतला .
हिंदुत्वाची शान हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे तसेच शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोहन देशमुख व आकाश मुंगळे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये पक्षप्रवेश केला.
त्यांच्यासह सुजीत देशमुख, अतुल धावारे, अक्षय देशमुख, दयानंद सारफळे, सादिक सय्यद, सुमित पवार, अमित देशमुख, अजिंक्य देशमुख, अभय देशमुख, असिफ सय्यद,विकास धावारे, आशिष धावारे, अक्षय क्षिरसागर, श्रीकृष्ण देशमुख, जयदिप देशमुख, सत्यजित देशमुख, अभिजित सारफळे, प्रदिप देशमुख, आप्पाराव रोकडे, रोहित धावारे या सहकाऱ्यांसह अन्य युवकांनी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला.
आमदार कैलास पाटील,माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, उपजिल्हाप्रमुख विजयकुमार सस्ते, तालुकाप्रमुख सतिषकुमार सोमाणी, शाम जाधव यांनी त्यांचे शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शिवसेना पक्षाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न आपण सोडवाल आणि हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहचवून शिवसेना संघटना बळकट करून पक्ष वाढीसाठी व जनतेच्या हितासाठी ते भरीव कार्य करतील असा विश्वास आहे जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी माजी गटनेते सोमनाथ गुरव, माजी नगरसेवक बाळासाहेब काकडे, पंकज पाटील, रवि कोरे आळणीकर, सौदागर जगताप, वैभव वीर, मोईन खान, अभिजित देशमुख, पांडुरंग माने, किरण चव्हाण, दीपक पाटील, ओंकार आगळे, शाम पाटील, अमित उंबरे, दिनेश बंडगर, संकेत सूर्यवंशी, अतिक सय्यद, विजय ढोणे, शरीफ शेख, सुनील गायकवाड, महेश उपासे, महंमद शेख आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.