वैद्यकीय महाविद्यालयात मिशन आनंदी अंतर्गत
महिलांच्या कर्करोग निदान व उपचाराबाबत प्रशिक्षण संपन्न
उस्मानाबाद,दि,08(प्रतिनिधी):- मिशन आनंदी' अंतर्गत ३० वर्षावरील प्रत्येक महिलांचे रक्तदाब, मधुमेह, ऍनिमिया गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग स्तनाचा कर्करोग निदान व तपासणी संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात सर्व तालुका स्तरावर एप्रिल २०२३ पासून राबविला जात आहे. स्त्री रुग्णालय उस्मानाबाद मध्ये दररोज रक्तदाब, मधुमेह, ऍनिमिया गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग स्तनाचा कर्करोग निदान व तपासणी करण्यात येते. या अनुषंगाने pap smear तसेच Biopsy चे नवीन तंत्रज्ञान चे प्रशिक्षण स्त्री रुग्णालय उस्मानाबाद मध्ये आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणाचे उदघाटन जिल्हा परिषद उस्मानाबाद चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, उस्मानाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चे अधिष्ठता डॉ. शिल्पा डोमकुंडवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी,स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्मिता सरोदे,कळंब रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शेळके, जिल्हा समन्वयक डॉ. धनश्री घाटशीळे, यांच्या हस्ते या प्रशिक्षणाचे उदघाटन करण्यात आले, हे प्रशिक्षण डेन्मार्क देशातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. प्रिया चौहान यांनी घेतले यांनी गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग स्तनाचा कर्करोग निदान व उपचार याबाबत सविस्तर प्रशिक्षण दिले.
या प्रशिक्षणासाठी उस्मानाबाद, कळंब, वाशी, भूम, मुरूम, तुळजापूर, तेर, सास्तूर, परंडा, उमरगा येथील रुग्णालयातील सर्व स्त्रीरोग तज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, शिरीष धाडी, स्टाफ नर्स, स्त्री रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्तिथ होते.
****