उस्मानाबाद) :अन्न ,वस्त्र , निवारा या प्रमाणेच सध्याच्या जगात इंटरनेट हि एक मूलभूत गरज बनली आहे . धाराशिव मध्ये पण टेलिग्राम , पेटीएम , गुगल पे , फेसबुक मार्फत सायबर गुन्ह्यात वाढ झाल्याची आपण पाहतो . कोविड महामारीच्या काळात तर शिक्षण आणि बरेचसे व्यवहार ऑनलाईन झाले . याचाच दुरुपयोग हॅकर्स ने घेतला व मागील वर्षात सायबर गुन्ह्यात ५१% ने वाढ पाहायला मिळाली , सायबर हल्यात जवळपास जगात ०१ ट्रिलियन डॉलर चे नुकसान झाले .अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हे गुन्हे रोखण्याचे प्रशिक्षण देणे महत्वाचे ठरते .
सायबर सेक्युरिटी , क्लाऊड सेक्युरिटी , पायथॉन प्रोग्रामिंग , नेटवर्किंग अशा तंत्रज्ञानाचा अभ्यास विद्यार्थ्यांना असणे अत्यंत गरजेचे आहे , याचाच भाग म्हणून देशातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी एआयसीटीई , जगप्रसिद्ध कंपनी सिस्को,नासकॉम यांनी एकत्रित मिळून व्हर्चुअल इंटर्नशिप चे आयोजन केले आहे .तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय उस्मानाबादच्या प्रथम , द्वितीय , तृतीय वर्षाच्या १३५ विद्यार्थ्यांनी या इंटर्नशिप साठी सहभाग नोंदवला आहे . दोन महिने कालावधी असणाऱ्या या इंटर्नशिप मध्ये विद्यार्थ्यांना सिस्को ने दिलेले विविध विषयातील कोर्सेस पूर्ण करायचे आहेत . १५ जून २०२३ पर्यंत सर्व विद्यार्थी हे कोर्से पूर्ण करतील . व्हर्चुअल इंडस्ट्री सेशन होणार आहे त्यामध्ये सिस्कोचे रिजनल मॅनेजर श्री. मार्सेला ओशिया , सिस्कोचे इंडिया सार्क चे प्रेसिडेंट दैसी चित्तापल्ली, एआयसीटीईचे चेअरमन डॉ.टी .जी.सीताराम
यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध टेक्नॉलॉजी मधील कंपनीचे तज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत . या इंटर्नशिप चा भाग म्हणून विद्यार्थ्यांना " डिजाईन ऑफ सेक्युर कॅम्पस नेटवर्क " हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे .
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन , कॉम्पुटर सायन्स , सिव्हिल इंजिनीरिंग , आर्टिफिशीयल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स मधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला व कोर्से सर्टिफिकेशन पूर्ण करत आहेत . विद्यार्थ्यांच्या या उत्स्फूर्त सहभागाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. पदमसिंह पाटील , आ. राणाजगजितसिंह पाटील , विश्वस्त मल्हार पाटील,सर्व विश्वस्त ,प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने , व्यवस्थापकीय समन्वयक प्रा.जी.एन भातलवंडे , विभागप्रमुख डॉ.डि.डी.दाते , डॉ. पी.एस. कोल्हे , प्रा.एस.ए.गायकवाड ,प्रा.एस.एम.पवार , डॉ.यु.के.वडने , प्रा.पी .एम. पवार यांनी अभिनंदन केले . कोर्से कोऑर्डिनेटर तसेच इंटर्नशिप कोऑर्डिनेटर म्हणून प्रा. अनिरुद्ध देशपांडे , इंस्ट्रक्टर म्हणून प्रा.के.सी.मुळे हे काम पाहत आहेत .