तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आठ दिवसाचे 'आर प्रोग्रामिंग' या संगणकीय भाषेचे प्रशिक्षण संपन्न
उस्मानाबाद : तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय हे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त पॅकेज मिळण्याच्या उद्देशाने नेहमीच विद्यार्थीसाठी औदयोगिक प्रशिक्षण व हँड्स ओन ट्रेनिंग देण्यात आघाडीवर असते.आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व डेटा सायन्स या विभागाने 60 विदयार्थी साठी आठ दिवसाचे 'आर प्रोग्रामिंग' या संगणकीय भाषेचे प्रशिक्षण आयोजित केले होते. सदरचे प्रशिक्षण लीडसॉफ्ट आयटी सोल्यूशन्स या कंपनीमार्फत देण्यात आले . प्रसिद्ध ट्रेनर प्रो. सुरज पवार यांनी मुलांना आर प्रोग्रामिंग या संगणकीय भाषेचे प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण नंतर मुलांची वेगवेगळ्या शंकाचे निरसन प्रो. सुरज पवार सर यांनी केले . प्रशिक्षणासाठी ६० मुलांनी उपस्थिती लावली होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी या प्रसंगी बोलताना असे म्हणाले कि " आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व डेटा सायन्स हा फक्त एक शब्द नसून हा एक बदल आहे. ह्या तंत्रज्ञानामुळे भविष्यात जगाचे रूप बदलणार आहे. येणारे शतक हे फक्त आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचे लक्षात ठेवले जाईल. कारण तेव्हा ह्याचा वापर प्रत्येक क्षेत्रात करून अनेक क्षेत्र विकसित होऊ शकतात.जेव्हापासून मशीनची कल्पना अस्तित्वात आली तेव्हापासून आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ने लोकांच्या जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडला आहे." विभागप्रमुख प्रा. प्रदीप पवार यांनी यावेळी मुलांना संबोधताना असे म्हणाले कि "आजकाल वाढत असलेल्या टेक्नॉलॉजी च्या वापरामुळे अनेक विद्यार्थी आपला कल हा आर्टिफिशिअल इंटेलिजन्स व डेटा सायन्स क्षेत्राकडे करत आहेत. त्यामध्ये डेटा सायंटिस्ट या क्षेत्रामध्ये नोकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लोकांकडून प्रतिसाद देण्यात येत आहे. मात्र वाटते तसे डेटा सायंटिस्ट (Data Scientist) याचे काम काही सोपे नसते, यासाठी संख्याशास्त्र, तुमची युनिक थिंकिंग प्रोसेस आणि प्रोग्रामिंग या तिन्ही विषयांची तुम्हाला मजबूत पकड असणे फार आवश्यक आहे. तुम्हाला जर डेटा सायंटिस्ट बनायचे असेल तर तुमच्यामध्ये कौशल्य असणे फार आवश्यक आहे." प्रशिक्षण घेण्याऱ्या मुलांना मार्गदर्शन करताना प्रो.सुरज पवार असे म्हणाले कि "आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग डेटा सायन्स यांच्याद्वारे दिलेल्या तंत्रज्ञानाचे उपयोग आपल्या प्रश्नांचे निदान किंवा अनुकरण करण्यासाठी वापरतात. मानवी हस्तक्षेपाशिवाय अब्जावधी डेटा संचयामधून उत्तर शोधण्याची अमर्याद शक्यता व क्षमता डेटा सायन्स तंत्रज्ञानामध्ये मध्ये आहे व ह्याचाच वापर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग या क्षेत्रांमध्ये केला जातो.डेटा सायन्स बनण्यासाठी तुम्हाला काही कोडींग भाषा माहिती असणे आवश्यक जसे कि पायथन, एस.क्यू.एल आणि आर प्रोग्रामिंग या संगणकीय भाषेचे अनन्य साधारण महत्व समजावून सांगितले.
या प्रशिक्षणामुळे विद्यार्थी औद्योगिक व सामाजिक आर प्रोग्रामिंग चा उपयोग करून प्रोजेक्ट पूर्ण करतील असा विश्वास विद्यार्थी मध्ये आला आहे.हे प्रशिक्षण व्यवस्थित रित्या पार पाडण्यासाठी ट्रैनिंग कोऑर्डिनटोर प्रा. वी . एस . बोंदर, प्रा. आर. ए.सरवदे यांनी परिश्रम घेतले . तेरणा ट्रस्ट चे अध्यक्ष माननीय डॉ. पद् मसिंह पाटील साहेब ,विश्वस्त माननीय आमदार श्री . राणाजगजितसिंह पाटील , माननीय विश्वस्त श्री . मल्हार पाटील आणि महाविद्यलयाचे समन्व्यक श्री गणेश भातलवंडे यांनी प्रशिक्षक आणि विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले.