सुरत - चेन्नई ग्रिनफिल्ड महामार्ग परंडा व तुळजापूर तालुक्यातील भूसंपादन मोजणी अहवालाबाबत आक्षेप असल्यास २८ जुलै पर्यंत नोंदवावे पविभागीय अधिकारी योगेश खरमाटे

0

सुरत - चेन्नई ग्रिनफिल्ड महामार्ग परंडा व तुळजापूर तालुक्यातील भूसंपादन मोजणी अहवालाबाबत आक्षेप असल्यास २८ जुलै पर्यंत नोंदवावे पविभागीय अधिकारी योगेश खरमाटे

 

उस्मानाबाद,दि,21( osmanabad news ):- सुरत - चेन्नई ग्रिनफिल्ड महामार्गाकरीता परंडा व तुळजापूर तालुक्यातील एकुण 32 गावातील भुसंपादनाची प्रक्रिया सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, उस्मानाबाद यांचे मार्फत सुरु असून सदर दोन्ही तालुक्यातील प्राप्त संयुक्त मोजणी अहवाल तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय येथे दर्शनीय भागात डकविण्यात आलेले आहे. सदर संयुक्त मोजणी अहवालाबाबत काही आक्षेप, तक्रार असल्यास संबंधित भुधारकांनी लेखी आक्षेप अर्ज सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उस्मानाबाद यांचे कार्यालयात दिनांक 28 जुलै 2023 पर्यंत दाखल करावेत. तदनंतर सक्षम प्राधिकारी तथा उप विभागीय अधिकारी यांनी प्राप्त आक्षेप अर्ज संबंधित उप अधिक्षक भूमी अभिलेख यांचेकडे फेरचौकशी करिता पाठविण्यात यावेत.

तदनंतर सक्षम प्राधिकारी तथा उप विभागीय अधिकारी उस्मानाबाद यांचेकडून प्राप्त आक्षेप, तक्रारी अर्ज संबंधित उपअधिक्षक भूमी अभिलेख यांचेकडे पुढील कार्यवाहीस्तव पाठविण्यात येईल.. संबंधीत उप अधिक्षक भूमी अभिलेख यांनी प्राप्त आक्षेप अर्जानुसार नोटीस काढून सदर नोटीस संबंधीतास तामील केलेनंतर जायमोक्यावर जाऊन 7 दिवसाच्या आत तक्रारीचे अनुषंगाने फेरचौकशी करून सुधारीत संयुक्त मोजणी अहवाल सक्षम प्राधिकारी तथा उप विभागीय अधिकारी, उस्मानाबाद यांचेकडे सादर करावेत.

तरी सदर जाहीर प्रगटनाद्वारे आवाहन करण्यात येते की, ज्या भुधारकांच्या संपादीत  क्षेत्राबाबत तसेच इतर बाबी बाबत आक्षेप, तक्रारी आहेत अशा भुधारकांनी दिनांक 28 जुलै 2023 पर्यंत आक्षेप, तक्रारी अर्ज सक्षम प्राधिकारी तथा उप विभागीय अधिकारी, उस्मानाबाद यांचे कार्यालयात सादर करावेत.असे आवाहन उपविभागीय  अधिकारी योगेश खरमाटे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top