प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत इतरांच्या नावे विमा भरुन केलेल्या फसवणूकीकरिता सीएससी केंद्रचालकांवर गुन्हा

0

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत इतरांच्या नावे विमा भरुन केलेल्या फसवणूकीकरिता सीएससी केंद्रचालकांवर गुन्हा

 

उस्मानाबाद,दि.17( osmanabad news ):- प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023-24 अंतर्गत उस्मानाबाद तालुक्यातील सांजा येथील श्रीराम देवस्थान कसबे तडवळा यांच्या मालकीच्या जमिनीवर 2023-24 या सालाकरीता अतिरीक्त पीक विमा भरणा केले असल्याबाबतची तक्रार विक्रम रामभाऊ सुर्यवंशी आणि सांजा येथील इतर शेतकरी यांनी दिली होती. या तक्रारीमध्ये नमुद सांजा येथील श्रीराम देवस्थान कसबे तडवळा यांच्या मालकीच्या जमिनीवर गट नंबर 191 व 124 मंधील क्षेत्रावर प्रदिप चत्रभुज थोरात तर गट नंबर 229, 349 आणि 610 मधील क्षेत्रावर संदिप चत्रभुज थोरात यांच्या नावे सीएससी आयडी क्रं. 613423310010 वरुन भरण्यात आलेला होता.

 तक्रारदार शेतकऱ्यांनी सादर केलेल्या दस्तऐवजानुसार व विमा कंपनीकडील पीक विमा भरलेल्या यादीनुसार छानणी केली असता या दस्तऐवजावर संदिप चत्रभुज थोरात आणि प्रदिप चत्रभुज थोरात यांची नावे दिसून येत नाहीत. करीता सदर प्रकरणी जिल्हा व्यवस्थापक, कॉमन सर्विस सेंटर, जिल्हा बिड यांना सीएससी आयडी क्रं. 613423310010 हा कोणाच्या नावे नोंदणीकृत आहे याची विचारणा केली असता त्यांच्याकडून बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील बनकरंजा येथील संदिप चत्रभुज थोरात यांच्या नावे असल्याचे कळविलेले आहे. या प्रकरणी संदिप चत्रभुज थोरात यांना या कार्यालयाने नोटीस बजावून खुलासा प्राप्त केला. खुलास्यामध्ये त्यांनी “मी नवीन कॉमन सर्विस सेंटर धारक असून माझ्याकडून नजरचुकीने चुकीचे कागदपत्र व गट नंबरची निवड करण्यात आली आहे” असे नमूद केले आहे.

खरीप हंगाम 2022 मध्ये देखील उस्मानाबाद तालुक्यातील सांजा येथील श्रीराम देवस्थान कसबे तडवळा यांच्या मालकीच्या जमिनीवर गट नंबर 535, 627, 349 आणि 628 मधील क्षेत्रावर प्रदिप चत्रभुज थोरात यांच्या नावे सीएससी आयडी क्रं. 641311170015 वरुन भरलेला आहे व त्याच्या मोबदल्यात प्रदिप चत्रभुज़ थोरात यांच्या नावे विमा कंपनीकडून रक्कम 15 हजार 255 रुपये विमा भरपाई जमा करण्यात आलेली आहे. 

संदिप चत्रभुज थोरात आणि प्रदिप चत्रभुज थोरात हे जाणीवपूर्वक उस्मानाबाद तालुक्यातील सांजा येथील श्रीराम देवस्थान कसबे तडवळा यांच्या मालकीच्या जमिनीवर विमा भरुन इतर शेतकऱ्यांची, शासनाची आणि विमा कंपनीची फसवणूक करत असल्याने प्रधानमंत्री पीक विमा योजना शासन निर्णय आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार उस्मानाबाद आनंद नगर पोलिस स्टेशन येथे तालुका कृषी अधिकारी यांच्यामार्फत संदिप चत्रभुज थोरात सामुहीक सेवा केंद्र चालक (CSC) बीड यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अशाच प्रकारे इतर शेतकऱ्यांच्या जमिनीवर पीक विमा उतरविलेला असेल त्यांनी तो अर्ज रद्द करण्याबाबत balasaheb.gopal@hdfcergo.com  या ईमेल आयडीवरती अर्ज मेल करावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. अन्यथा भविष्यामध्ये अशा बाबी आढळल्यास त्यांच्यावरही मुळ शेतकरी फौजदारी गुन्हा दाखल करतील याची नोंद घ्यावी,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top