श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान मार्फत ऑनलाईन पध्दतीने , सिंहासन पूजा नोंदणीचे भाविकांना आवाहन , Shree Tuljabhavani Mandir Sinhasan Puja

0



श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान मार्फत ऑनलाईन पध्दतीने , सिंहासन पूजा नोंदणीचे भाविकांना आवाहन , Shree Tuljabhavani Mandir Sinhasan Puja 

उस्मानाबाद,दि.17( osmanabad news ):- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह देशातील आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि इतर राज्यातून मोठ्या संख्येने भाविकांची कुलदेवता असल्याने या ठिकाणी कुलाचार व कुलधर्म करण्यासाठी येतात. श्री देवीजींची सिंहासन पूजा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. सिंहासन पूजा ऑनलाईन पध्दतीने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर http://shrituljabhavani.org  उपलब्ध करुन देण्यात येत आहे. माहे ऑगस्ट- 2023 या महिन्याच्या सिंहासन पूजेच्या नोंदणीसाठी पुढीलप्रमाणे वेळापत्रक करण्यात येत आहे.

सिंहासन पूजा नोंदणी दि.21 जुलै रोजी सकाळी 10.00 वा.पासून ते 26 जुलै पर्यंत सकाळी 10.00 वा.पर्यंत करता येईल. ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने प्रथम सोडत व भाविकांना पेमेंटसाठी एसएमएस दि.26 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजेपर्यंत पाठविण्यात येईल.

भाविकांना प्रथम सोडतीचे ऑनलाईन पेमेंट 26 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजल्यापासून ते 27 जुलै रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत करता येईल. सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने द्वितीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी एसएमएस दि.27 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजेपर्यंत पाठविला जाणार आहे.

भाविकांना द्वितीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट दि.27 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजल्यापासून ते दि.28 जुलै रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत करता येईल. प्रथम व द्वितीय फेरीत सिंहासन संख्या पूर्ण न झाल्यास ऑनलाईन ड्रॉ पध्दतीने तृतीय सोडत व भाविकांना पेमेंटसाठी एसएमएस दि. 28 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजेपर्यंत  पाठविण्यात येणार आहे.

भाविकांना तृतीय सोडतीचे ऑनलाईन पेमेंट दि.28 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजल्यापासून ते 29 जुलै रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत करता येईल. माहे जुलै 2023 या महिन्यातील अंतिम सिंहासन पूजा बुकींग झाल्याची यादी दि.29 जुलै रोजी सायंकाळी 05.00 वाजता प्रसिध्द करण्यात येईल.

          भाविकांनी सिंहासन पूजा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अधिकृत संकेतस्थळ http://shrituljabhavani.org वरुन सिंहासन पूजा पास बुकींग या मेन्यूवर क्लिक केल्यानंतर http://shrituljabhavanimataseva.org या लिंकवर प्रवेश करुन भाविकांनी आपली सिंहासन पूजेची नोंदणी करावी आणि सिंहासन पूजा नोंदणीचा लाभ घ्यावा, असे श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top