वसंतदादा नागरी सहकारी बँके व संचालक मंडळावर केलेले सर्व आरोप, खोडसाळपणे‌, तथ्यहीन व बदनामी करण्यासाठीच - रोहीत दंडनाईक यांचा खुलासा

0

वसंतदादा नागरी सहकारी बँके व संचालक मंडळावर केलेले सर्व आरोप, खोडसाळपणे‌, तथ्यहीन व बदनामी करण्यासाठीच - रोहीत दंडनाईक यांचा खुलासा

उस्मानाबाद  - दि.२५ (प्रतिनिधी) - येथील वसंतदादा नागरी सहकारी बँकेवर काहीजणांनी मुद्दाम व खोडसापणाने तसेच केवळ बँकेची व संचालक मंडळाची बदनामी करण्यासाठीच सुपारी घेऊन बातम्या दिल्या असल्याचा खुलासा बँकेचे तत्कालीन चेअरमन विजय दंडनाईक यांचे चिरंजीव रोहित दंडनाईक यांनी केला आहे. दरम्यान रिझर्व बँकेने काही निर्बंध घातल्यामुळे ठेविधानांच्या ठेवी देण्यास तांत्रिक अडचण उद्भवली असून ते निर्बंध शितल होताच त्यांच्या ठेवी परत केल्या जातील असे आश्वासन त्यांनी दिले आहे.


उस्मानाबाद शहरातील वसंतदादा नागरी सहकारी बँकेवर होणारे आरोप हे अत्यंत धंदाट खोटारडे व चुकीचे असून त्याला कुठलाही आधार नाही. मात्र रिझर्व बँकेच्या निर्बंधामुळे या बँकेच्या व्यवहारावर परिणाम झाला असून ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यास तांत्रिक अडचणी निर्माण झालेले आहेत. त्या अडचणी दूर होताच संबंधित ठेवीदाराचे व्यवहार पूर्ण केले जातील. मात्र काही विघ्न संतोषी मंडळींनी विनाकारण या बँकेची व बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाची सुपारी घेऊनच विनाकारण बातम्या देऊन बदनामी करण्याचा चंग बांधला आहे. सत्य हे कितीही दडवले तरी ते कधी ना कधी समोर आल्याशिवाय राहणार नाही असे सांगत आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून ठेवीदारांनी अशा अफावर अजिबात विश्वास ठेवू नये अशी आवाहन दंडनाईक यांनी केले आहे. 


तसेच तत्कालीन चेअरमन विजय दंडनाईक यांनी १९० लोकांच्या नावे कर्ज उचलून स्वतः:च्या उद्योग व्यवसायासाठी वापरले असे अशी बातमी प्रकाशित करून तथाकथित पत्रकाराने स्वतःचेच हास्य करून घेतले आहे. या कर्जदारांचा व दंड नाईक यांचा कसलाही संबंध नसून हे प्रकरण न्यायव्यवस्थेकडे प्रविष्ट असल्यामुळे याचा पोलीस प्रशासन त्यांच्या परीने तपास करीत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे बँकेकडे १२ कोटी रुपये शिल्लक तर येणे बाकी ७५ कोटी रुपये व ठेवीदारांची ५० कोटी रुपये देणे बाकी होते. त्यावेळी म्हणजे नोव्हेंबर २०१७ मध्ये रिझर्व्ह बँकेने या बँकेवर निर्बंध लादले. त्यामुळे ती देणी शक्य झाले नाही. तर २०२१ पर्यंत बँकेचा परवाना रद्द होईपर्यंत तत्कालीन चेअरमन दंडनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली २८ कोटी रुपयांची कर्ज वसुली झाली होती. तसेच परवाना रद्द झाला त्यावेळी बँकेची जमा शिल्लक ३४ कोटी रुपये व कर्ज वसुली जवळपास ५० कोटी रुपये येणे बाकी होती. मात्र रिझर्व बँकेने एक वर्षात वसुली अहवाल विचारात न घेता बँकेचा परवाना रद्द केला. 


या विरोधात बँकेचे चेअरमन व संचालक मंडळांनी रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठात रिटपिटीशन दाखल केली आहे. या बँकेच्या ३८ हजार १६० ठेवीदारांपैकी ५ लाखांवरील ठेवी असलेल्या १३९ ठेवीदारांचे देणी बाकी आहेत. तर त्या १३९ देवीदारांची ठेवी परत करण्यासाठी बँकेची सभासद वसंतदादा बँकेचे रूपांतर पतसंस्थेमध्ये करण्याचे प्रयत्न करीत आहेत. या बँकेचे पतसंस्थेत रूपांतर करण्यासाठी जिल्हा उपनिबंधकांनी सभासदांची सर्वसाधारण सभा घेण्यासाठी अवसायक यांना निर्णय घेण्यास आदेशित केले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. मात्र काही ठराविक ठेवीदार वैयक्तिक दिशा पोटी चेअरमन दंड नाईक यांच्यावर गुडांचे आरोप करीत आहेत. दंडनाईक यांनी ३५ वर्षांपूर्वी चालू केलेली संस्था पुन्हा उभारणीसाठी प्रयत्न करीत असून त्यासाठी कायदेशीर लढा देत आहेत. त्यामुळे उर्वरित १३९ ठेवीदारांच्या ठेवी परत देता येतील. तसेच या माध्यमातून पूर्वी सारखीच सर्वसामान्य व गोरगरिबांना त्यांच्या शेती, व्यवसाय, घर बांधकाम, त्यांच्या पाल्यांची लग्न कार्य, शिक्षणासाठी कर्ज रुपाने करता येईल असे रोहीत दंडनाईक यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top