युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे शनिवारी जिल्ह्यात

0
 
युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे शनिवारी जिल्ह्यात 

उस्मानाबाद दि.24 ( osmanabadnews ) क्रीडा व युवक कल्याण,  मंत्री संजय बनसोडे हे शनिवार 26 ऑगस्ट जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. 26 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता शासकीय वाहनाने लातूर येथून मुरुड, ढोकीमार्गे उस्मानाबादकडे करतील. दुपारी 3.30 वाजता शासकीय विश्रामगृह,उस्मानाबाद येथे आगमन व राखीव.दुपारी 4 वाजता सुनील प्लाझा,श्री.तुळजाभवानी स्टेडियम उस्मानाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नूतन जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन करतील.कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या समवेत बैठक व नूतन पदाधिकारी यांना निवडीचे नियुक्त पत्र वाटप करतील.सोयीनुसार उस्मानाबाद येथून मोटारीने लातूरकडे प्रयाण करतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top