जळालेल्या घराची नव्याने उभारणी करुन मानव हित जोपासल्या बद्दल अक्षय ढोबळे यांचा मतदार जनजागरण समितीच्या वतीने सत्कार

0

जळालेल्या घराची नव्याने उभारणी करुन मानव हित जोपासल्या बद्दल अक्षय ढोबळे यांचा मतदार जनजागरण समितीच्या वतीने सत्कार

उस्मानाबाद :- उस्मानाबाद येथील माजी नगरसेवक तथा युवा सेनेचे मराठवाडा विभागीय सचिव अक्षय ढोबळे हे सातत्याने जनहिताचे काम करत आहेत,कोरोना काळात प्रभागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी केलेली धडपड आणि रस्ते नाल्या साठी नगर परिषद वरती चिखल मय काढलेला मोर्चा अन्य कार्यासाठी ते प्रचलित आहेत,दोन दिवसांपूर्वी अण्णा भाऊ साठे चौक येथील ताटे कुटुंबातील घर रात्रीच्या दिव्याने पेट घेऊन जळाले होते,ताटे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अतिशय गरिबी असुन ते यातुन सावरू शकत नव्हते, याबाबत अक्षय ढोबळे यांना याबाबत कळाले असता त्यांनी ताटे कुटुंबाला शोधत घडलेल्या घटनांचा व पावसाचा तात्काळ विचार करता त्यांनी पत्र्याचे शेड चांगले उभारुन त्याला रंगरंगोटी,मॅट, आवश्यक भांडी अन्नधान्य किट दिले हे त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे,त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून मतदार जनजागरण समिती उस्मानाबादच्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर भारतीय संविधान उद्देशिकाच्या प्रति समोर सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.मखमली टोपी, गुलाब पुष्पहार घालुन गौरविण्यात आले.यावेळी मतदार जनजागरण समितीचे अब्दुल लतिफ,धनंजय वाघमारे, राजेंद्र धावारे,इकबाल पटेल,गणेश रानबा वाघमारे,संजय गजधने,बाबा गुळीग,विजय गायकवाड,दिपक पांढरे,फेरोज पठाण,अतुल लष्करे,स्वराज जानराव,श्रीकांत मटकिवाले,सोहन बनसोडे, सोनवणे अन्य इतर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अब्दुल लतिफ यांनी केले तर आभार संजय गजधने यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top