पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर शेकापूर सरपंचासह सदस्यांचे उपोषण आंदोलन स्थगित
उस्मानाबाद -
खोट्या तक्रारी करून वारंवार त्रास दिला जात असल्याच्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी उस्मानाबाद तालुक्याील शेकापूर ग्रामपंचायतच्या सरपंच व सदस्यांनी सुरू केलेले उपोषण पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या आश्वासनानंतर बुधवारी (दि.9) मागे घेण्यात आले.
शेकापूर गावातील वादग्रस्त जागेच्या प्रकरणात पोलिसांना कळवूनही त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. तसेच जातीय तणाव, अतिक्रमण या विषयावर पोलिसांकडून खोटे गुन्हे दाखल करून पतीला त्रास दिला जात असल्याने गतवेळच्या निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार किशोर लगदिवे यांची चौकशी करून कारवाई करावी या मागणीसाठी सरपंच पुष्पा किरण लगदिवे, सदस्य किरण लगदिवे, पोपट लगदिवे, सागर विधाते, राजाभाऊ लगदिवे, विद्यासागर विधाते, बालाजी विधाते यांनी 6 ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. दरम्यान, प्रशासनाने उपोषणाची दखल घेतली नव्हती. बुधवारी पालकमंत्री उस्मानाबाद जिल्हा दौर्यावर आले असता ही बाब त्यांना कळविण्यात आली. त्यानंतर शिवसेनेचे अनिल खोचरे, तालुकाप्रमुख अजित लाकाळ यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पालकमंत्र्यांशी चर्चा घडवून आणली. त्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले. यापुढेही कारवाई न झाल्यास पुन्हा उपोषण करणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे.
पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर शेकापूर सरपंचासह सदस्यांचे उपोषण आंदोलन स्थगित
ऑगस्ट ०९, २०२३
0
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा