नळ कनेक्शन मिळत नसल्याने महिलेचा आत्मदहनाचा इशारा

0

नळ कनेक्शन मिळत नसल्याने आत्मदहनाचा इशारा

उस्मानाबाद : शहरातील श्री स्वामी समर्थ नगर येथील रहिवासी सर्वे नंबर 326/2 मधील घर नंबर 13/ 1175 वार्ड 13 मध्ये नळ कनेक्शन हवें आहे परंतु नगरपालिका घराच्या शेजारी असलेल्या साळुंखे नगर मध्ये नगरपालिकेची पाईपलाईन आहे तेथील संस्था सोसायटी अध्यक्ष व सचिव स्थानिक लोक व नगरपालिकेचे कर्मचारी पाईपलाईन देण्यास आल्यास त्याचा विरोध करत आहेत व आम्ही इथून पाईपलाईन देऊ देणार नाहीत म्हणून कनेक्शन देण्यास नकार देत आहे वारंवार भेटून नकार देत आहे म्हणून आत्मदहन करत आहे. उस्मानाबाद जिल्हाधिकारी व नगरपरिषद मुख्याधिकारी यांना अनिता प्रशांत शेटे यांनी निवेदन दिले आहे.

आत्मदहन केल्यास यास सोसायटीचे स्थानिक रहिवासी अध्यक्ष सचिव नगरपालिका कर्मचारी यास जबाबदार असतील योग्य ती चौकशी करून न कनेक्शन देण्यात यावे अन्यथा 10 ऑगस्ट 2023 रोजी आत्मदहन करणार आहे असे निवेदनात म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top