समाजकल्याणच्या विविध पुरस्कारासाठी १५ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव मागविले

0


समाजकल्याणच्या विविध पुरस्कारासाठी १५ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव मागविले

 

उस्मानाबाद,दि.08( osmanabadnews ):- सामाजिक न्याय विभागामार्फत समाज कल्याण क्षेत्रामध्ये वैशिष्टपुर्ण काम करणाऱ्या व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन मिळावे म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार ,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार,संत रविदास पुरस्कार, शाहु, फुले आंबेडकर पुरस्कार व डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार यांचे नावाने पुरस्कार देऊन  व्यक्ती व संस्थांना सन्मानपुर्वक गौरविण्यात येते.

त्याअनुषंगाने उस्मानाबाद जिल्हयातील सन 2022-23 साठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहु, फुले आंबेडकर पुरस्कार व डॉ.बाबासाहेब सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार आदी पुरस्काराचे प्रस्ताव  15 ऑगस्ट 2023  पर्यंत सादर करावेत. असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बी.जी.अरवत यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top