उस्मानाबाद,दि.08( osmanabadnews ):- जिल्ह्यातील भटक्या विमुक्त जमातीच्या नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी तालुकास्तरावर विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.या शिबिरात भटक्या विमुक्त जमातीच्या नागरिकांची मतदार नोंदणी,रेशनकार्डचे वितरण,विविध दाखले,संजय गांधी योजना यासारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. शिबिराचे नियोजन करण्याकरिता 11 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या समाजासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्था,प्रतिनिधी किंवा नागरिकांनी या बैठकीला उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांनी केले आहे.
भटक्या विमुक्त जमाती नागरिकांसाठी विशेष शिबिर आयोजनासाठी ११ ऑगस्ट रोजी सभा
ऑगस्ट ०९, २०२३
0
भटक्या विमुक्त जमाती नागरिकांसाठी विशेष शिबिर आयोजनासाठी ११ ऑगस्ट रोजी सभा
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा