उस्मानाबाद जिल्ह्यात पाच ठिकाणी चोरी गुन्हा दाखल

0



उस्मानाबाद जिल्ह्यात पाच ठिकाणी चोरी गुन्हा दाखल 

Osmanabadnews:- 

वाशी पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- परमेश्वर मनोहर भारती, वय 46 वर्षे, रा. शिवली, ता. औसा जि. लातुर सोबत हमाल नामे- सहदेव उत्तम गायरे, बलभिम माने  दोघे रा. शिवली, ता. औसा जि. लातुर यांचा  टेम्पो क्र एमएच 25 यु 0780 हा दि.01.08.2023 रेाजी 01.00 वा. सु. इंदापूर ता.  वाशी येथील साखर कारखान्यासमोर बंद पडल्याने परमेश्वर भारती व सोबत हमाल टेम्पो मध्ये झोपले असता तिन अनोळखी इसमांनी दोन्ही हमालांना मारहाण करीत केबीन जवळ आणुन त्यांचे गळ्याला सत्तुर लावून परमेश्वर यांना केबीन मधून खाली उतरवून त्यांचे पॅन्टचे खिशातील 1,700₹ जबरदस्तीने काढून घेवून टेम्पो मधील अंदाजे 7,000₹ किंमतीचे 70 लिटर डिझेल चोरुन नेले. अशा मजकुराच्या परमेशवर भारती यांनी दि.01.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 394,34  अन्वये गुन्हा नोंदवला आहे.



तुळजापूर पोलीस ठाणे :  फिर्यादी नामे- सौरभ सुभाष बगडी, वय 23 वर्षे रा. पा घर  नं बी 53 सारागौरव नळदुर्ग रोड तुळजापूर जि. उस्मानाबाद यांचे राहते घराचे दरवाजाचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.31.07.2023 रोजी 18.00 ते दिण्‍01.08.2023 रोजी 07.45 वा. सु. तोडून कपाटातील रोख रक्कम एकुण 5,000 ₹ चोरुन नेली. अशा मजकुराच्या सौरभ बगडी यांनी दि.01.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


मुरुम पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-बस्वराज सायबाण्णा पांढरे, वय 43 वर्षे, रा. हनुमान मंदीराजवळ आलुर ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांची अंदाजे 30,000₹ किंमतीची हिरो स्प्लेंडर मोटरसायकल क्र एमएच 13 डीएल 3284 ही दि. 31.07.2023 रोजी 22.00 ते दि.01.08.2023 रोजी 01.05 वा. सु. पांढरे यांचे राहत्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या बस्वराज पांढरे यांनी दि.01.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.



तुळजापूर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- विठ्ठल गंगाराम रहाटे, वय 59 वर्षे, रा. 302 सरोवर बिल्डींग बाबुराव जगताप मार्ग, सुंदर गल्ली, भायखळा, जेकप सरकल मुंबई हे दि. 01.08.2023 रोजी 11.40 वा. सु. नवीन बसस्थानक तुळजापूर येथे नांदेड ते सोलापूर बस मध्ये चढत असताना त्यांचे गळ्यातील  16 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन अंदाजे 48,000 ₹ किंमतीची अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून त्यांचे नकळत चोरुन नेली. अशा मजकुराच्या विठ्ठल राहटे यांनी दि.01.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.



वाशी पोलीस ठाणे :फिर्यादी नामे- सुखलाल सोमनाथ पवार, वय 52 वर्षे, धंदा ड्रायव्हर, रा.खेडे ता. धुळे, जि. धुळे हे टाटा आयशर टॅम्पो क्र टीएन 18 बीजे 3188  हा दि. 30.07.2023 रोजी 22.00 ते 23.15 वा. सु. इंदापूर पाटीजवळ कारखाना ते पारगाव टोलनाका  येथुन जात होते दरम्यान  अज्ञात व्यक्तीने टॅम्पो मधील जयपुर गोल्डन ट्रान्सपोर्ट कंपनीचा माल ज्यात ग्राउंडर, कटर, हॅमर ईत्यादीचे वेगवेगळे 8 बॉक्स अंदाजे 46,100 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या ड्रायव्हर सुखलाल सोमनाथ पवार यांनी दि.01.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top