तीस टक्के परतावा भेटण्याचे आमिष दाखवून अकरा लाख एकेचाळीस हजार रुपयाची फसवणूक गुन्हा दाखल - tuljapur online Fraud
Osmanabad : Tuljapur Police Station:
तुळजापूर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-1) शिशीर शहाजीराव खोपडे, वय 33 वर्षे माउली नगर, तुळजापूर जि. उस्मानाबाद यांचे दि.02.07.2023 रोजी 15.17 ते दि. 05.07.2023 रोजी 15.22 वा. सु. आयसीआयसी आय शाखा तुळजापूर येथे मोबाईल फोनवर मोबाईल क्र 8348720514 यावरुन टीआर ओएन 89 डॉट कॉम वेबसाईटवर पैसे गुतंवणूक करण्याचे उद्देशाने व 30 टक्के परतावा भेटण्याचे आमिष दाखवून एकुण 11,41,000₹ आरोपीच्या नमुद खात्यावर पैसे पाठविण्यास सांगून आमिष दाखवून भाग पाडून शिशीर खोपडे यांची फसवणुक केली आहे.अशा मजकुराच्या शिशीर खोपडे यांनी दि.01.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 420, सह आयटी ॲक्ट कायदा कलम 66(सी), 66(डी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
अशी माहिती osmanabad police च्या वतीने देण्यात आली आहे. फोन द्वारे येणाऱ्या व एसएमएस द्वारे येणाऱ्या कोणत्याही अमिषाला नागरिकांनी बळी पडू नये तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याची संपर्क साधावा व फसवणुकीपासून लांब राहावे. असे आवाहन उस्मानाबाद त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.