शिवसेनेचे अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, दत्ता साळुंके यांचा संयुक्त पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील खासदार, आमदारांवर हल्लाबोल

0

जनतेच्या प्रश्नांशी देणे-घेणे नसलेल्या खासदार, आमदारांनी राजीनामा देऊन घरी बसावे

शिवसेनेचे अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, दत्ता साळुंके यांचा संयुक्त पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील खासदार, आमदारांवर हल्लाबोल


उस्मानाबाद -
राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी जिल्ह्याची आढावा बैठक घेतली. या बैठकीस सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित असताना जिल्ह्याचे खासदार आणि सर्व आमदारांनी पाठ फिरवली. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणे-घेणे नसलेल्या खासदार व आमदारांनी राजीनामा देऊन घरी बसावे, असा हल्लाबोल शिवसेनेचे अनिल खोचरे, जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, दत्ता साळुंके यांनी जिल्ह्यातील खासदार व आमदारांवर केला.

उस्मानाबाद येथील शासकीय विश्रामगृहात गुरूवारी (दि.10) झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी, सुरज साळुंके अनिल खोचरे, दत्ता साळुंके, अजित लाकाळ यांची उपस्थिती होती.

जिल्हाप्रमुख सुरज साळुंके म्हणाले की, जनतेचे, शेतकर्‍यांचे प्रश्न आढावा बैठकीत मांडून त्याची सोडवणूक करणे गरजेचे असताना खासदार आणि आमदार जाणीवपूर्वक गैरहजर राहिले. त्यांना केवळ राजकारण करून चमकोगिरी करायची असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या खासदार आणि आमदारांनी राजीनामा देऊन घरी बसणे योग्य असल्याचे मत श्री.सुरज साळुंके यांनी व्यक्त केले.

अनिल खोचरे म्हणाले की, जिल्ह्याचे खासदार, आमदार विधानसभेच्या सभागृहात ज्या पद्धतीने प्रश्न मांडतात त्याप्रमाणेच जिल्ह्यातील प्रश्न मांडण्यासाठी जिल्ह्याच्या आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहणे गरजेचे होते. सभागृहात एक बोलायचे आणि आपल्रूा मतदारसंघात आल्यावर एक बोलायचे हा प्रकार म्हणजे पब्लिसिटी स्टंट असल्याची टिका खोचरे यांनी केली.

दत्ता साळुंके म्हणाले की, जिल्ह्यातील तळागाळातील माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू मानून पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत यांनी काम हाती घेतले आहे. नगर परिषदेअंतर्गत विकासकामे, रस्ते, पाटबंधारे, जिल्हा परिषद विभागांतर्गत कामे मोठ्या प्रमाणात केली आहेत. जिल्ह्यात साखर कारखाने सक्षमपणे चालवून शेतकर्‍यांना न्याय देण्याचे काम प्रा.डॉ.सावंत हे करीत आहेत. ह्याच पद्धतीने कामे सुरू राहिले तर आपले राजकारण टिकणार नाही या भावनेतून जिल्ह्याचे खासदार व आमदारांकडून राजकीय खेळी केली जात असल्याचेही ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top