आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत ११२ जिल्हयापैकी विविध योजना व उपक्रम राबविण्यात उस्मानाबाद जिल्हा १० वा
उस्मानाबाद,दि.10( osmanabadnews ):- आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत नीति आयोगाने देशातील 22 राज्यातून एकूण 112 जिल्ह्यांची आकांक्षित जिल्हा म्हणून निवड केली आहे. त्या 112 जिल्ह्यांपैकी उस्मानाबाद जिल्ह्याची आकांक्षित जिल्हा म्हणून निवड करण्यात आली. जिल्हा निर्देशांक मध्ये वाढ व्हावी याकरिता सर्व प्रयत्न केले जात असल्यामुळे आज आपला जिल्हा देशात 10 वा आलेला आहे. ही बाब नक्कीच जिल्हा प्रशासनासाठी अभिनंदनीय बाब आहे. उस्मानाबाद जिल्हा कायम प्रगतशील राहावा यासाठी विविध प्रयत्न केले जातीलच आणि यापुढे आपली कामगिरी अजून जास्त उंचावण्यासाठी कायम कटिबद्ध राहतील असे जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे म्हणाले.
आकांक्षित जिल्हा कार्यक्रम सन 2018-19 पासून राबविण्यात येत असून चार वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. सदरील योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या सहा क्षेत्रातील 49 निर्देशांकांमध्ये वृद्धी होणेकरिता उस्मानाबाद जिल्ह्यात विविध योजना, कार्यक्रम,नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत.
आकांक्षीत जिल्हा कार्यक्रम अंतर्गत निश्चित केलेले क्षेत्र: आरोग्य व पोषण (Health & Nutrition), शिक्षण (Education), कृषि व जलस्त्रोत (Agriculture and Water Resources), आर्थिक समावेशन (Financial Inclusion), कौशल्य विकास (Skill Development), मुलभूत सुविधा (Basic Infrastructure) नीती आयोगाच्या डॅशबोर्डवर दर महिना मासिक प्रगती अहवाल भरला जातो व केंद्राकडून दर महिन्याची आकडेवारी प्रसिद्ध केली जाते. त्यानुषंगाने सध्या जून महिन्याची आकडेवारी प्रसिद्ध झाली असून उस्मानाबाद जिल्ह्याची क्षेत्रनिहाय प्रगती दर्शविणारा तक्ता खालीलप्रमाणे आहे. एकूण जिल्ह्यांपैकी उस्मानाबाद जिल्ह्याचा कृषि व जलस्त्रोत क्षेत्रात 3 नंबर, व तसेच शिक्षण क्षेत्रात 8 नंबर आणि आरोग्य व पोषण क्षेत्रात 19 नंबर रँक वर आहे. आपल्या जिल्ह्याचा प्रगती होण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन यंत्रणाकडून वारंवार मेहनत केली जाते. जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांचेकडून सदरील क्षेत्रात प्रगती व्हावी याकरिता नेहमी क्षेत्रनिहाय आढावा बैठक घेऊन संबंधित कार्यान्वयीन यंत्रणा कायम सूचना देऊन मार्गदर्शन केले जाते.