शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची छावा संघटनेची मागणी

0

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची छावा संघटनेची मागणी

उस्मानाबाद दि.९ (प्रतिनिधी) - उस्मानाबाद जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी मार्फत पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्याकडे दि.९ ऑगस्ट रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड व बारा बलुतेदार यांना एकत्रित करून हिंदवी स्वराज्य निर्माण केले. राज्यातील रयतेस लेकरांप्रमाणे जीव लावणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिप्रेत असणारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उस्मानाबाद येथे सुरू आहे. त्या महाविद्यालयास छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी छावा संघटनेने केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळुंके, जिल्हा संघटक अमोल गोरे, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष रोहित पाटील, वाहतूक आघाडीचे धाराशिव तालुकाध्यक्ष शिवाजी भोसले, वाहतूक आघाडीचे विकास कोळी, शहराध्यक्ष सचिन रणखांब आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top