लोकशाहीर व साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दहिवडी आरोग्य शिबीरात ४१० रुग्णांची तपासणी व उपचार
लोकशाहीर व साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दहिवडी ता. तुळजापूर जि.उस्मानाबाद येथे दि.०८ ऑगस्ट २०२३ रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये विनामूल्य आरोग्य तपासणी, उपचार करण्यात आले.
मंगळवार दिनांक ०८ ऑगस्ट रोजी दहिवडी ता. तुळजापूर आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ४१० रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले. यापैकी ७०रुग्णांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याने त्यांच्यावर तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल, नेरुळ येथे पुढील उपचार करण्यात येणार आहेत. या शिबीरात प्रमुख उपस्थीती आयोजक ग्रा.प.सदस्य विठ्ठल गायकवाड, मा. सरपंच बापूसाहेब गाटे, पोलिस उपनिरीक्षक गितांजली दुधाने, शिवाजी (मालक) गोरे, पोलिस पाटील रमेश गाटे, सरपंच सौ. रुपाली गाटे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गाटे ग्रा. प. सदस्य संजय आदलींगे, कल्पना अंबूरे, सचिन गाटे, उपसरपंच भागवत कुंडलीक, योगेश डोलारे, गणेश गायकवाड, राम गायकवाड, सदगुरु गायकवाड, तात्या गायकवाड, पोपट गायकवाड, बाळासाहेब गवळी, कल्याण साठे, ग्रामसेवक रमेश यल्लम इत्यादी उपस्थित होते तसेच कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ. ओम खानापुरे, डॉ. मयुर पाटील, डॉ.अक्षय कांबळे, डॉ. नयन डोळस यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे विनोद ओव्हाळ, रवी शिंदे, सचिन व्हटकर, योगेश मारडकर, आशा कार्यकर्त्या संगिता भालशंकर यांनी परिश्रम घेतले.