सहाय्यक पोलीस फौजदाराकडून ३३ शेतकऱ्यांची फसवणुक गुन्हा नोंद
Osmanabadnews : उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी पोलीस ठाणे हद्दीत :आरोपी नामे- नानासाहेब भानुदास भोसले रा. बॅक कॉलनी, उस्मानाबाद धंदा नोकरी सपोफौ/39 ने नागरी हक्क संरक्षण विभाग उस्मानाबाद यांनी दि.16.01.2022 ते 24.04.2022 रोजी वेळीवेळी रुईभर व बरमगाव येथे एकुण 33 शेतकऱ्यांचा शेतातील हरभरा 520 क्विंटल 76 किलो, सोयाबीन 263 क्विंटल 57 किलो असा एकुण 784 क्विंटल 33 किलो किंमत अंदाजे 50,35,043 ₹ चा शेती माल आडत दुकानापेक्षा जास्त भव देतो असे सांगून वेळोवेळी विकत घेवून त्याचे पैसे ठरलेल्या मुदतीत न देता त्यांचे बॅक खात्यावर रक्कम नसल्याचे माहित असताना देखील सदर रकमेचा चेक दिला व वटलेला नाही फिर्यादी नामे नागनाथ बाबुराव वडवले, वय 42 वर्षे रा. रुईभर ता. जि. उस्मानाबाद व इतर शेतकऱ्यांचे पैसे न देता व बॅकेत न वटनारा चेक देवून फसवणुक केली आहे. अशा मजकुराच्या नागनाथ बाबुराव वडवले, वय 42 वर्षे रा. रुईभर ता. जि. उस्मानाबाद यांनी दि.12.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 417,420 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.