वीज ग्राहकांसाठी तक्रारीचा निपटारा करण्यासाठी ८ संप्टेबर रोजी अदालतीचे आयोजन
वाशी : ( प्रतिनिधी :- दत्ता भराटे )
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कं. मर्या वाशी उपविभागीय यांच्यावतीने सर्व वीज ग्राहक यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्या आदेशानुसार वाशी तालुक्यातील सर्व वीज ग्राहकाच्या असलेल्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी महावितरण उपविभागीय वाशी विद्युत ग्राहक अदालतीचे वाशी येथे दि.8/9/2023 रोजी सकाळी 11:00 वाजता आयोजित करण्यात आलेले आहे तरी वाशी तालुक्यातील सर्व वीज ग्राहकांनी लाभ घ्यावा ही असे आवाहन विद्युत विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.