शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यासाठी १३ सप्टेंबर रोजी आझाद मैदान येथे मोर्चा - देशमुख

0


शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यासाठी १३ सप्टेंबर रोजी आझाद मैदान येथे मोर्चा - देशमुख

उस्मानाबाद :  सिटु (CITU) प्रणीत महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार फेडरेशनच्या वतीने दि. १३-९-२०२३ रोजी आझाद मैदान मुंबई येथे प्रलंबित मागण्यासाठी मोर्चाचे आयोजन केले आहे.


 तामीळनाडु राज्याच्या धर्तीवर शालेय पोषण आहार कामगारांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा द्या, समान कामाला समान वेतन द्या,  पंजाब व तामीळनाडु राज्यप्रमाणे १० महिने ऐवजे १२ महिने मानधन द्या, ४. दि. २.२.२०१९ च्या शासन निर्णयाप्रमाणे इंधन भाजीपाला व पुरक आहार कामगारांनीच आणावा या मध्ये मुख्यध्यापकाने हस्तक्षेप करु नये, केरळ राज्याप्रमाणे शालेय पोषण कामगारांना १८००० रुपये मानधन द्या, सेंट्रल किचन प्रणाली बंद करा,  सन १९९५ राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर सहनियंत्रण समिती स्थापन करून या मध्ये संघटनेचा एक प्रतिनिधी घ्या, विनाकारण विनाचौकशी कामावरून कमी करु नका, यासाठी व्यवस्थापन समितीला कमी करण्याचे अधिकार देवू नका,  कर्नाटक राज्यात दुर्घटना झाल्यास ५० हजार रुपये, मृत्यु झाल्यास १ लाख रुपये, हरीयाना प्रमाणे ६ महिने मातृत्व रजा उतराखंड राज्यात १००० रुपये ड्रेस भत्ता आणि केरळ राज्यात २००० रु. प्रत्येक सणाला बोनस म्हणुन दिले जाते इत्यादीसह अनेक प्रलंबित मागण्यासाठी मोर्चाचे आयोजन केले आहे.

हा मोर्चा सिदु संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा राज्य अध्यक्ष कॉ. डॉ. डि. एल. कराड, सिटुचे राज्य महासचिव कॉ. अॅड. एम. एच. शेख, फेडरेशनचे राज्य अध्यक्ष कॉ. प्रा. ए. बी. पाटील, फेडरेशनचे प्रभारी व सिटुचे राज्य उपाध्यक्ष कॉ. डॉ. विवेक मॉन्टोरो, फेडरेशनचे महासचिव कॉ. अशोक थोरात, कोषाध्यक्ष कॉ. मिरा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चाचे आयोजन केले आहे.

तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व शालेय पोषण आहार कामगारांनी दि. १३.९.२०२३ रोजी सकाळी ११.०० वा. आझाद मैदान मुंबई येथे उपस्थित रहावे असे आव्हान महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुसुम देशमुख यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top