पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिवाळी सणा निमित्त एक हात मदतीचा गरजवंतासाठी उपक्रमाचे आयोजन.”
धाराशिव-उस्मानाबाद: पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून दिवाळी सणा निमित्त एक हात मदतीचा गरजवंतासाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन दि. 11.11.2023 रोजी पोलीस मुख्यालयातील गार्डन लॉनवर करण्यात आले. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे या सणाचा आनंद अनेक गोरगरिब कुटुंबातील लोकांना मिळत नाही म्हणून त्यांना या सणाच्या आनंदात सहभागी करुन घेण्यासाठी या उपक्रमात गोरगरीब कुटुंबाला फराळाचे साहित्य, मुलांसाठी कपडे, शैक्षणिक साहित्य तसेच जिवन आवश्यक वस्तू या मा. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी , श्रीमती महिमा कुलकर्णी मॅडम यांच्या हस्ते 350 ते 500 गोरगरिब कुटुंबातील लोकांना भेट स्वरुपात वाटप करण्यात आले.
तसेच आज दि.12.11.2023 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातील अंशकालीन कर्मचारी यांना फराळाचे साहित्य, तसेच जिवन आवश्यक वस्तू हे मा. पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी साहेब व श्रीमती महिमा कुलकर्णी मॅडम यांच्या हस्ते 30 ते 40 अंशकालीन कर्मचारी यांना भेट स्वरुपात वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमास मा. पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी , श्रीमती महिमा कुलकर्णी मॅडम, उप विभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड, पोलीस ठाणे धाराशिवचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख, राखीव पोलीस निरीक्षक आरविंद दुबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिध्देश्वर गोरे, पोलीस अधिक्षक कार्यालय येथील पोलीस अधिकारी, पोलीस अमंलदार तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील 30 ते 40 अंशकालीन कर्मचारी व गोरगरिब 350 ते 500 कुटुंबातील व्यक्ती उपस्थित होते.