अनैतिक देह व्यापार करणा-या लॉजवर छापा.चार महिलांची सुटका, दलालासह लॉजचालक व मॅनेजर विरुध्द गुन्हा दाखल

0



अनैतिक देह व्यापार करणा-या लॉजवर छापा.चार महिलांची सुटका, दलालासह लॉजचालक व मॅनेजर विरुध्द गुन्हा दाखल

 

धाराशिव स्थानिक गुन्हे शाखा : पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव मोरे यांच्या पथकाने जिल्हातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढुन कायदेशीर कारवाई करण्यासाठी दि. 21.12.2023 रोजी गस्तीस होते. गस्ती दरम्यान पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि,  धाराशिव शहरात तुळजापूर ते धाराशिव नॅशनल हायवेच्या रस्त्यालगत असलेल्या ‘निसर्ग गारवा लॉज’ येथे लॉज चालक- व्यवस्थापक हॉटेलमध्ये काही महिलांद्वारे वेश्या व्यवसाय करवुन घेत आहेत. यावर पथकाने एका बनावट ग्राहकास तेथे पाठवून बातमीची खात्री करुन नमूद लॉजवर 16.05 वा. सु. छापा टाकला असता लॉज मध्ये चार महिला (नाव- गाव गोपनीय) आढळुन आल्याने महिला पोलीसांमार्फत त्यांची विचारपुस केली असता हॉटेल चालक दिलीप रामदास आडसुळे, वय 63 वर्षे,रा. करंजकर हॉस्पीटल जवळ धाराशिव,दलाल- बालाजी चंद्रकांत गवळी, वय 29 वर्षे, रा. लहुजी नगर नागनाथ रोड धाराशिव, हे दोघेजण नमुद लॉजचे मालक 1)नितीन रेाहीदास शेरखाने रा. धाराशिव  यांचे सांगण्यावरुन त्या महिलांना वाणिज्यिक प्रयोजनाकरीता आश्रय देउन त्यांना लैंगीक स्वैराचाराकरीता परावृत्त करत होते व नमुद तिघेजण त्यावर स्वत:ची उपजिवीका करत आहेत असे समजले. यावरुन पथकाने लॉज मॅनेजर  नामे- 1) दिलीप रामदास आडसुळे, वय 63 वर्षे, रा. करंजकर हॉस्पीटल जवळ धाराशिव, दलाल-2) बालाजी चंद्रकांत गवळी, वय 29 वर्षे, रा. लहुजी नगर नागनाथ रोड धाराशिव, यांना ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातील मोबाईल फोन, नोंदीचे रजिस्टर, ॲटोरिक्षा क्र एमएच 09 जे 8134, रोख रक्कम 16,130 व निरोधची  पाकीटे असा एकुण 71,130 ₹ माल हस्तगत केला. पोलीसांनी संबंधीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या लॉजवरील त्या महिलांची सुटका करुन (लॉजमालक) 1)नितीन रेाहीदास शेरखाने रा. धाराशिव, लॉज मॅनेजर-2) दिलीप रामदास आडसुळे, वय 63 वर्षे,रा. करंजकर हॉस्पीटल जवळ धाराशिव, दलाल- 3) बालाजी चंद्रकांत गवळी, वय 29 वर्षे, रा. लहुजी नगर नागनाथ रोड धाराशिव, यांचेविरुध्द गुरनं 352/2023 भा.दं.वि. सं. कलम- 370, 370 (अ) (2), 34 सह मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम कलम- 3, 4, 5 अन्वये धाराशिव ग्रामीण  पोलीस ठाण्यात  दि. 21.12.2023 रोजी गुन्हा नोंदवला आहे.

            सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या आदेशावरुन व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक- श्री. वासुदेव मोरे, पोलीस हावलदार- अश्विनकुमार जाधव, दिलीप जगदाळे, हुसेन सय्यद, समाधान वाघमारे, शोभा बांगर, शैला टेळे, पोलीस अमंलदार- साईनाथ आशमोड, योगेश कोळी,  रंजना होळकर, चालक पोलीस अमंलदार- भोसले, अरब यांच्या पथकाने केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top