धाराशिव जिल्ह्यात चार ठिकाणी चोरी, गुन्हे दाखल

0



धाराशिव जिल्ह्यात चार ठिकाणी चोरी, गुन्हे दाखल 

लोहारा पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- इंदुमती देविदास भालेरव, वय 47 वर्षे, रा.तोरंबा ता. लोहारा जि. धाराशिव यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 01.05.2024 रोजी 02.30 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील 34 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 30किलो चॉद तारा तांदुळ, 45 किलो तेल, रोख रक्कम 5,000₹ व ब्रेकर मशीन असा एकुण 1,26,300₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- इंदुमती भालेराव यांनी दि.11.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे  457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

 

 

आनंदनगर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-तस्लीम गणी काझी, वय 57 वर्षे, रा. रामनगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 30,000₹ किंमतीची मोटरसायकल एचएफ डिलक्स कंपनी क्र एमएच 25 एबी 1272 जिचा इंजिन नं-HA11 EFE9F 27777, चेसी नं- MBLHA11AEE9F12111ही दि.02.05.2024 रोजी 10.00 ते 10.15 वा. सु.नगर पालीकेच्या बाजूस हॉटेल सनरिच समोर धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- तस्लीम काझी यांनी दि.11.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर पोलीस ठाणे : दि. 12.04.2024 रोजी 17.30 वा. सु. ते दि. 14.04.224 रोजी 02.47 वा. सु. सांगवी मार्डी शिवारातील  जिओ कंपनीचे टॉवर मधील 60 मिटर लांबीचे 6 आर आर एच केबल व 02 सिप्श्रि केबल असा एकुण 5,000₹ किंमतीचे केबल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-आण्णासाहेब जगन्नाथ कोळेकर, वय 40 वर्षे, रा.नरुटेवाडी ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर यांनी दि.11.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

कळंब पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-कैलास दशरथ जाधव, वय 32 वर्ष्ज्ञे, रा. युसुफवडगाव ता. केज ह.मु. परळी बायपास रोड कळंब ता. कळंब जि. धाराशिव  यांची अंदाजे 20,000₹ किंमतीची हिरो होंडा कंपनीची काळ्या रंगाची पॅशन प्रो मोटरसायकल क्र एमएच 44 क्यु 0289 व इंजिन नं MA10EvgHH46575 व चेसी नं- MBLHA1BSGHH39638 ही दि. 25.04.2024 रोजी 22.00 ते दि. 26.05.2024 रोजी 03.00 वा. सु. कैलास यांचे राहाते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-कैलास जाधव यांनी दि.11.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे 379 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top