google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 उस्मानाबाद जिल्ह्यात 2 ठिकाणी मारहाण: गुन्हे दाखल

उस्मानाबाद जिल्ह्यात 2 ठिकाणी मारहाण: गुन्हे दाखल

0


उस्मानाबाद जिल्ह्यात 2 ठिकाणी मारहाण: गुन्हे दाखल

उस्मानाबाद ,पोलीस ठाणे, तुळजापूर: तिर्थ (बु.), ता. तुळजापूर येथील रुपाली व रणजीत सगट हे दोघे पती- पत्नी दि. 31.10.2020 रोजी 21.00 वा. सु. आपल्या घरासमोर थांबले होते. यावेळी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन भाऊबंद- पोपट कोंडीबा सगट, किशोर सगट, कोंडीबा सगट, संपदा सगट यांनी रुपाली व रणजीत यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. तसेच रुपाली यांच्या घरासमोरील पाण्याचा नळ तोडून नुकसान केले. अशा मजकुराच्या रुपाली सगट यांनी वैद्यकीय उपचारादरम्या दिलेल्या लेखी निवेदनावरुन काल दि. 25.11.2020 रोजी पो.ठा. तुळजापूर येथे भा.दं.सं. कलम- 324, 427, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद, पोलीस ठाणे, नळदुर्ग: मैनोद्दीन हाफीजोद्दीन मुजावर व रसुल खाजोद्दीन मुजावर, दोघे रा. काटगांव, ता. तुळजापूर हे दि. 25.11.2020 रोजी 16.30 वा. सु. गावातील आपल्या टेलर दुकानात होते. यावेळी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन गावकरी- सचिन लक्ष्मण हुकीरे व संकेत रेवन खोबरे यांनी मुजावर यांच्या दुकानासमार येउन मैनोद्दीन व रसुल यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मैनोद्दीन मुजावर यांनी आज दि. 26.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top