google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 उस्मानाबाद जिल्ह्यात 6 ठिकाणी अवैध मद्य विरोधी कारवाई

उस्मानाबाद जिल्ह्यात 6 ठिकाणी अवैध मद्य विरोधी कारवाई

0


उस्मानाबाद जिल्ह्यात 6 ठिकाणी अवैध मद्य विरोधी कारवाई 

पोलीस ठाणे, लोहारा: अवैध मद्य विक्री चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन लोहारा पो.ठा. च्या पथकाने दि. 25.11.2020 रोजी लोहारा पो.ठा. हद्दीत वेगवेगळ्या तीन ठिकाणी छापे मारले.

पहिल्या घटनेत लक्ष्मण रंगराव येलारे, रा. सास्तुर, ता. लोहारा हा 18.00 वा. सु. सास्तुर शिवारात देशी दारुच्या 15 बाटल्या (किं.अं. 780/-रु.) विनापरवाना बाळगलेला आढळला.असतांना पो.ठा. बेंबळी च्या पथकास आढळला.

दुसऱ्या घटनेत बालाजी रुद्र भारती, रा. कानेगांव, ता. लोहारा हा 18.30 वा. सु. स्वत:च्या राहत्या घरासमोर देशी दारुच्या 15 बाटल्या (किं.अं. 900/-रु.) विनापरवाना बाळगलेला आढळला.

तिसऱ्या घटनेत तानाजी विश्वंभर मुर्टे, रा. कोंडजीगड, ता. लोहारा हा 18.50 वा. सु. गावातील एका टपरीजवळ देशी दारुच्या 10 बाटल्या (किं.अं. 520/-रु.) विनापरवाना बाळगलेला आढळला.

 

स्थानिक गुन्हे शाखा: आण्णासाहेब पोपट तनपुरे, रा. जवळा (नि.), ता. परंडा हा दि. 25.11.2020 रोजी गावातील ‘शंभु राजे ढाबा’ येथे देशी- विदेशी दारुच्या 17 बाटल्या (किं.अं. 2,345/-रु.) विनापरवाना बाळगलेला असतांना स्था.गु.शा. च्या पथकास आढळला.

पोलीस ठाणे, शिराढोन: कल्याण पंढरी खांडेकर उर्फ पप्पु, रा. बोरगांव (बु.), ता. कळंब हा दि. 25.11.2020 रोजी गावातील आपल्या राहत्या घरासमोर देशी- विदेशी दारुच्या 61 बाटल्या (किं.अं. 7,260/-रु.) विनापरवाना बाळगलेला असतांना पो.ठा. शिराढोन च्या पथकास आढळला.

पोलीस ठाणे, उमरगा: विनायक रामराव साळुंखे, रा. उमरगा हा दि. 25.11.2020 रोजी उमरगा येथील मुळज रस्त्यालगत असलेल्या उर्दू शाळेच्या जवळ 15 ली. शिंदी हे अंमली द्रव्य (किं.अं. 990/-रु.) अवैधपणे बाळगलेला असतांना पो.ठा. उमरगा च्या पथकास आढळला.

यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद आरोपींविरुध्द संबंधीत पोलीस ठाण्यात म.दा.का. अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top