वाशी येथे दरोड्याच्या तयारीतील 5 आरोपी अटकेत.
उस्मानाबाद : पोलीस ठाणे, वाशी: वाशी पो.ठा. चे सपोफौ- मधुकर घायाळ यांसह पोना- जगताप यांसह पथक वाशी पो.ठा. हद्दीत आज दि. 26.11.2020 रोजी रात्रगस्तीस होते. गस्तीदरम्यान पथकास 02.30 वा. सु. इंदापुर फाटा परिसरातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वरील साखर कारखान्याजवळ एका कारच्या बाजूस 2 परुष संशयीतरित्या थांबलेले आढळले. पथकाने त्या ठिकाणी जाउन पाहिले असता इंडीका कार क्र. एम.एच. 06 एएफ 8975 मध्येही 3 परुष बसलेले होते. पथकाने त्या 5 पुरुषांची चौकशी केली असता त्यांची नावे 1)अशोक शहाजी शिंदे, खामकरवाडी, ता. कळंब 2)रणधीर दशरथ पवार, रा. सांजा, उस्मानाबाद 3)तात्या प्रल्हाद काळे, रा. तेरणा कॉलेज जवळ, उस्मानाबाद 4)दशरथ संदिपान शिंदे, रा. दसमेगांव, ता. वाशी 5)15 वर्षीय युवक असल्याचे समजले. त्या ठिकाणी हजर असण्याबाबत विचारता त्यांच्या सांगण्यात तफावत येत असल्याने यावर पथकाचा संशय बळावल्याने त्यांची व कारची तपासणी केली. यावर कार मध्ये चाकु, कत्ती, मिरची पुड, 8 मीटर नायलॉन दोरी, 35 ली. क्षमतेचे 3 रिकामे कॅन व 3 मीटर लांबीची बांगडी नळी आढळली. यावरुन ते 5 पुरुष महामार्गाच्या बाजूस विश्रांतीस थांबलेल्या ट्रकचे इंधन चोरण्याच्या किंवा वाटमारी करण्याच्या तयारीत असल्याची पथकाची खात्री झाली. त्यांना ताब्यात घेउन त्यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 399 अन्वये आज दि. 26.11.2020 रोजी गुन्हा नोंदवला असुन पुढील तपास वाशी पोलीस करीत आहेत.