उस्मानाबाद येथे मंजूर झालेल्या मेडिकल कॉलेजला डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे नाव देण्याबाबत जिल्हाधिकार्यांना निवेदन
उस्मानाबाद :- नुकताच मंत्रिमंडळाने जाहीर केलेल्या उस्मानाबाद येथील मेडिकल कॉलेज ला डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम नाव देण्यात यावे अशी मागणी AIMIM वतीने करण्यात आली आहे.
उस्मानाबाद ला मेडिकल कॉलेज मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार देखील या निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना हे निवेदन देण्यात आले आहे
या वेळी पठाण जमीर, सय्यद अजहर, पठाण शेरु, मुजावर अजहर, पटेल हैदर, इम्तियाज बागवान, वसीम निचलकर, अजहर निचलकर, सोहेल शेख, काझी शहेबाझ, इफतेखार पटेल आदी उपस्थित होते.