Osmanabad जिल्ह्यातील पहिली Mobile diesel van : डिझेल आपल्या दारात सेवेचा आज शुभारंभ

0

डिझेल आपल्या दारात सेवेचा आज शुभारंभ

उस्मानाबाद जिल्ह्यातील पहिली मोबाईल डिझेल व्हॅन.

 Osmanabad :  दि. 29- भारत पेट्रोलियम कार्पोरेशनच्या आता योग्य दरात ‘डिझेल आपल्या दारात’ या सेवेचा शुभारंभ शनिवार, 30 जानेवारी रोजी वरूडा चौक येथील श्रीराम हायवे सर्व्हिसेस येथे विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात प्रथमच श्रीराम हायवे सर्व्हिसेसच्या वतीने शेतकरी व ग्राहक यांच्या सेवेसाठी ग्राहकांना डिझेलचा पुरवठा मोबाइल व्हॅनद्वारे होणार आहे. या वाहनाचे विविध फायदे ग्राहकांना होणार आहेत. ही सेवा भारत सरकार मान्यताप्राप्त आहे. भारत पेट्रोलियमकडून शुद्धतेची हमी देण्यात आली आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार डिझेल घरपोच शेताच्या बांधावर उपलब्ध करून दिले जाणार आहे. या इंधनाची शुद्धता आणि पारख ग्राहकांसमोरच अद्यावत यंत्राद्वारे केली जाणार आहे. हे इंधन योग्य मापात आणि संगणकीय पावतीसह मिळणार आहे, अशी अत्याधुनिक सोयी-सुविधा असणारी मोबाइल डिझेल व्हॅन जिल्ह्यातील पहिलीच ठरली आहे.
मोबाइल डिझेल व्हॅन यांचा शुभारंभ सोहळा शनिवारी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, व्यवस्थापक महेंद्र दळवी, पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन, उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील अधिकारी प्रशांत भांगे, उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड, विक्रेय अधिकारी परवेज आलम, अभियंता सोहेल आझाद आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ होणार आहे. या सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीराम हायवे सर्व्हिसेसचे वैभव मोहन (आण्णासाहेब) उंबरे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top