उस्मानाबाद पालिकेच्या विषयी समितीवर महाविकास आघाडीचे वर्चस्व - Osmanabad Municipality

0
नवीन निवड झालेल्या उस्मानाबाद नगरपालिका पदाधिकाऱ्यांचे शहरातून कौतुकाचे वर्षाव

Osmanabad :  उस्मानाबाद नगर पालिकेच्या विषय समिती व सभापती पदाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत . सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी प्रदीप घोणे , शिक्षण व क्रीडा - सिध्देश्वर कोळी , पाणीपुरवठा व
जलनिसारण - निजामोद्दीन मुजावर , आरोग्य व स्वच्छता - राणा बनसोडे तर महिला बालकल्याण सभापतीपदी सोनाली वाघमारे यांची निवड झाली आहे . नगर पालिका विषय समिती व सभापती निवडीसाठी उपविभागीय अधिकारी तथा पिठासीन अधिकारी योगेश खरमाटे यांच्या
प्रमुख उपस्थितीत गुरूवारी ( दि .२८ ) विशेष सभा घेण्यात आली . यावेळी विविध विषय समितीचे गठण प्रत्येकी ११ सदस्यांची निवड करण्यात आली यानंतर सभापतींच्या निवडी जाहीर करण्यात आल्या . महिला व बालकल्याण उपसभातीपदी विद्या एडके यांची निवड झाली . स्थायी समितीच्या पदसिध्द अध्यक्षपदी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर सदस्यपदी खलील कुरेशी , शिवाजी पंगडूवाले सिध्दार्थ बनसोडे यांची तर नियोजन व विकास समिती सभापतीपदी पदसिध्द उपाध्यक्ष अभय इंगळे यांची निवड झाली . समिती निवडीसाठी नप मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांनी सहकार्य केले . विषय समिती सभापती निवडीत सेना व राष्ट्रवादीचे वर्चस्व तर पालिकेतील भाजपाचे आ . राणाजगजितसिंह पाटील समर्थक गटाची पिछेहाट झाल्याचे दिसून आले . निवडीची घोषणा होताच मान्यवरांच्या हस्ते नूतन सभापतींचा सत्कार करण्यात आला . यावेळी माजी नगराध्यक्ष अमित शिंदे यांच्यासह नप सदस्य उपस्थित होते .








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top