कळंब - अर्भकास बेवारस टाकणाऱ्या अज्ञातावर गुन्हा दाखल.
कळंब : - एका नवजात जिवंत पुरुष अर्भकाचे संगोपन टाळण्याच्या उद्देशाने त्यास कापडात गुंडाळून कळंब येथील शेळी बाजाराजवळील जि.प. शाळा मैदानात बेवारस सोडलेले असल्याचे कळंब पो.ठा. चे पोलीस कॉन्स्टेबल- बाळासाहेब गोंदकर यांना 03 ते 04 फेब्रुवारी दरम्यानच्या रात्र गस्तीदरम्यान आढळले. यावरुन बाळासाहेब गोंदकर यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 317 अंतर्गत कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.