Osmanabad जिल्ह्यातील Vashi मध्ये 2 ठिकाणी मारहाण गुन्हा दाखल
पोलीस ठाणे, वाशी: गिरलगांव, ता. भुम येथील रविकिरण त्रिंबक रुपनावर हे 04 फेब्रुवारी रोजी 10.00 वा. सु. आपल्या घरासमोरील रस्त्यावर थांबलेले असतांना गावकरी- अनिकेत शिवाजी गोंदवले यांनी रविकिरण यांना वाहनाने हुलकावनी दिली. त्याचा जाब रविकिरण यांनी अनिकेत यांस विचारला असता अनिकेतसह अनिता गोंदवले, शिवाजी गोंदवले, पदमिनी गोंदवले यांनी रविकिरण यांस शिवीगाळ करुन, ठार मारण्याची धमकी देउन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी उलथन्याने मारहाण केली. यात रविकिरण यांचा दात तुटून ते जखमी झाले. अशा मजकुराच्या रविकिरण रुपनावर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, वाशी: नांदगांव, ता. वाशी येथील अशोक व सुदाम आंबादास घुले या दोघा पिता- पुत्रांनी त्यांच्या शेतातील विद्युत फलक पाडल्याच्या वादातून 02 फेब्रुवारी रोजी 06.00 वा. सु. अपंग असलेले भाऊबंद- विशाल चंद्रकांत घुले यांना नांदगांव शिवारात शिवीगाळ करुन तसेच ठार मारण्याची धमकी देउन लोखंडी पाईपने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या विशाल घुले यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 आणि अपंग व्यक्ती हक्क कायदा कलम- 92 (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.