Osmanabad जिल्ह्यात 2 ठिकाणी जुगार विरोधी कारवाई
पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): जुगार चालू असल्याच्या गोपनीया खबरेवरुन उस्मानाबाद (श.) पो.ठा. च्या पथकाने 04 फेब्रुवारी रोजी शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले. यात पहिल्या घटनेत साठे चौकात बबन गोरोबा तट, रा. तुळजापूर नाका, उस्मानाबाद हे कल्याण मटका जुगार साहित्य आणि 600 ₹ रोख रक्कम बाळगलेले तर दुसऱ्या घटनेत देशपांडे स्टॅन्ड येथे रामु आमनाथ पारसी, रा. झोरे गल्ली, उस्मानाबाद हे कल्याण मटका जुगार साहित्य व 550 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना पथकास आढळले.
पोलीस ठाणे, लोहारा: जवळी (उ.), ता. लोहारा येथील मोहन राम जेवळीकर हे 04 फेब्रुवारी रोजी गावातील ग्रामपंचायत समोर कल्याण मटका जुगार साहित्य व 500 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना लोहारा पो.ठा. च्या पथकास आढळले.
यावरुन पोलीसांनी जुगार साहित्य व रोख रक्कम जप्त करुन नमूद आरोपीविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.