Osmanabad जिल्ह्यात tuljapur , बेंबळी , शिराढोन या 3 ठिकाणी अवैध मद्य विरोधी कारवाया गुन्हे दाखल

0


Osmanabad जिल्ह्यात tuljapur , बेंबळी , शिराढोन या 3 ठिकाणी अवैध मद्य विरोधी कारवाया गुन्हे दाखल

पोलीस ठाणे, तुळजापूर: विजय हनमंत जटला, रा. सरवदे नगर, सोलापूर हे विदेशी दारुच्या व बियरच्या बाटल्या (किं.अं. 5,820 ₹) ह्युंदाई ग्रॅण्ड कार क्र. एम.एच. 13 सीके 2413 मधून अवैध वाहतूक करत असतांना तुळजापूर येथील नवीन बसस्थानक समोर तुळजापूर पो.ठा. च्या पथकास 03 फेब्रुवारी रोजी आढळले.

पोलीस ठाणे, बेंबळी: सुनिल दशरथ कदम, रा. अंबेवाडी, ता. उस्मानाबाद हे 03 फेब्रुवारी रोजी गावातील महाळंगी रस्त्यालगत 180 मि.ली. देशी दारुच्या 20 बाटल्या (किं.अं. 1,040 ₹) बाळगले असतांना बेंबळी पो.ठा. च्या पथकास आढळले.

पोलीस ठाणे, शिराढोन: दिपक भागवत शेळके, रा. खामसवाडी, ता. कळंब हे 180 मि.ली. देशी दारुच्या 13 बाटल्या (किं.अं. 676 ₹) गावातील पाण्याच्या टाकीखालील जागेत बाळगले असतांना शिराढोन पो.ठा. च्या पथकास 03 फेब्रुवारी रोजी आढळले.

       यावरुन पोलीसांनी मद्याच्या बाटल्या जप्त करुन नमूद आरोपींविरुद म.दा.का. अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top