Osmanabad जिल्ह्यात शिराढोन ,लोहारा , बेंबळी या 3 ठिकाणी मारहाण : गुन्हा दाखल
पोलीस ठाणे, शिराढोन: करंजकल्ला, ता. कळंब येथील विष्णु उध्दव पवार व एकनाथ उध्दव पवार या दोघां भावांत घर वाटणीच्या कारणावरुन वाद आहे. 02 फेब्रुवारी रोजी 16.15 वा. वाटणी चालू असतांना भांडणे होउन नमूद दोघा भावांनी परस्परांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, विटाने मारहाण करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. यावरुन नमूद दोघांनी दिलेल्या स्वतंत्र 2 प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.
पोलीस ठाणे, लोहारा: करजगाव, ता. लोहारा येथील विनायक लक्ष्मण गवळी याच्या भ्रमणध्वनीवरुन गावकरी- दयानंद ज्ञानोबा जाधव यांच्या भ्रमणध्वनीवर चुकून कॉल गेला असता जाधव यांनी, “तु माझ्या मोबाईलवर कॉल का केला?” असा जाब विचारुन गवळी यांना 22 जानेवारी रोजी 19.00 जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच गवळी हे पुण्याला जाण्यासाठी माकणी येथील बसस्थानकात 20.00 वा. आले असता तेथेही जाउन जाधव यांनी गवळी यांना जातीवाचक शिवीगाळ केली व माकणी- करजगाव येथे बळजबरीने आणुन ठार मारण्याच्या उद्देशाने कोयता घेउन त्यांच्या अंगावर धावून आले. यादरम्यान जाधव यांनी गवळी यांच्या खिशातील 3,200 ₹ रक्कम काढून घेतली. अशा मजकुराच्या विनायक गवळी यांनी 03 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392, 323, 504, 506 आणि ॲट्रॉसिटी कायदा कलम- 3 (1) (आर)(एस) आणि म.पो.का. कलम- 135 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, बेंबळी: तुळजापूर- औसा रस्त्यावरील भंडारी शिवारातील ‘हॉटेल रिलॅक्स’ येथे हॉटेलमध्ये 03 फेब्रुवारी रोजी 12.00 वा. सु. 1) अर्जुन नारायण बडवणे 2)साहिल राजेश जाधव, दोघे रा. परभणी 3) अभिषेक उध्दव विश्वकर्मा, रा. नाशिक 4)मुन्ना व अन्य दोन अनोळखी व्यक्ती असे 6 लोक भोजणास आले. दरम्यान हॉटेमधील सेवा चांगली नसल्याच्या कारणावरून त्यांनी हॉटेल मालक- अविनाश बाळासाहेब मोरे, रा. लातुर यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यापैकी अभिषेक विश्वकर्मा हा चाकू घेउन अविनाश मोरे व हॉटेल कामगारांवर धावून गेला असता पिता- बाळासाहेब मोरे व हॉटेल कामगारांनी त्यास पकडून ठेवले. यावर अर्जुन बडवणे याने पिस्तुलाने दोन काडतुसे डागली. त्यातील एक गोळी जमीनीवर लागली तर दुसरी बाळासाहेब मोरे यांच्या छातीत लागून ते गंभीर जखमी झाले. गोळीबारानंतर उर्वरीत 5 आरोपी घटनास्थळावरुन कारसह पसार झाले.
वरील मजकुराच्या अविनाश मोरे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद 6 लोकांविरुध्द भा.दं.सं. कलम- 307, 323, 352, 504, 506 आणि भारतीय शस्त्र कायदा कलम- 3, 4, 25 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.