उस्मानाबाद जिल्ह्यात मुरुम व वाशी या 2 ठिकाणी चोरी :गुन्हा दाखल
पोलीस ठाणे, मुरुम: कोराळ, ता. उमरगा येथील रमेश शिवाजी सुरवसे यांनी त्यांचा ट्रक राहत्या घरासमोर लावला असता 17 ते 21 जानेवारी दरम्यान अज्ञाताने ट्रकवरील टारपोलीन फाडून आतील वैद्यकीय उपकरणांनी भरलेले खोके (कि.अं. 11,000 ₹) चोरुन नेले. अशा मजकुराच्या रमेश सुरवसे यांनी 03 फेब्रुवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, वाशी: दसमेगाव, ता. वाशी येथील भिका आप्पा खंडागळे यांनी राहत्या घरासमोर बांधलेल्या दोन शेळ्या व चार बोकड 02 फेब्रुवारीच्या रात्री अज्ञाताने चोरुन नेले. अशा मजकुराच्या भिका खंडागळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.