google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 वसीम रजवीला अटक करण्याची तुळजापूर मुस्लीम बांधवाची मागणी

वसीम रजवीला अटक करण्याची तुळजापूर मुस्लीम बांधवाची मागणी

0
वसीम रजवीला अटक करण्याची तुळजापूर मुस्लीम बांधवाची मागणी 


तुळजापूर :-  वसीम रजवी (माजी अध्यक्ष शिया वक्फ बोर्ड उत्तर प्रदेश) यास रा.सु.का कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करुन ताबडतोब अटक करण्याची मागणी तुळजापूर येथील मुस्लीम बांधवांच्या वतीने करण्यात आली.
तहसिलदार, तुळजापूर यांचे मार्फत राष्ट्रपती महोदयांना दि. 18 रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विश्वासाला शांती अन् मानवतेचा संदेश देणाऱ्या इस्लाम धर्माचा पवित्र धर्मग्रंथ कुराण मधील आयाते हटविण्याची मागणी करणाऱ्या याचिकाकर्ते वसीम रजवी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. वसीम रजवी याची सदरचे कृत्ये हे धार्मिक भावना दुखवणारे असून, त्याच्याविरुध्द राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी व कडक शिक्षा करावी.

वसीम रजवी याने धर्मग्रंथातील कांही वचनांचा विपर्यास्त अर्थ घेऊन ते धर्मातुन हटविण्याची मागणी करताना इस्लाम धर्म ताकद व जबरदस्तीच्या बळावर वाढत आहे इ. असा धार्मिक भावना दुखावणारा संतापजनक आरोप करताना ती वचने धर्मग्रंथातुन हटविण्याची याचिकेव्दारे मागणी केली आहे. समाजकंटक वसीम रजवी याचे म्हणणे निराधार तसेच देशातील शांततेला बाधा पोंहचवणारा आहे. देशातील सामाजिक स्वास्थ बिघडऊ पाहणाऱ्या वसीम रजवी यांच्यावर रा.सु.का. नुसार कठोर कारवाई करावी, त्याला अशा कृतीबद्दल व समाजाची भावना दुखावल्याबद्दल व समाजात व देशामध्ये तेढ निर्माण करु पाहणाऱ्या समाजविघातक वसीम रजवी याचेवर कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी तुळजापूर येथील मुस्लीम बांधवाच्या वतीने निवेदनाव्दारे करण्यात आली. निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी, उस्मानाबाद, पोलीस निरीक्षक, तुळजापूर यांना देण्यात आल्या. निवेदनावर अॅड.मतीन बाडेवाले, खलील अहेमद शेख, रईस सिध्दीकी, हाज्जुमियाँ आतार, मतीन बागवान, मकसुद शेख, तौफीक शेख, मौलाना बिलाल रजा, रशीद तांबोळी, रिजाज सिध्दीकी, फहद तांबोळी, वाजीद नदाफ, समीर शेख, इम्रान शेख, खिजर सिध्दीकी, माजीद सिध्दीकी, पठाण एम.एम., के.टी, शेख, मुस्तफा नदाफ, आशपाक शेख, फैजान सिध्दीकी, अजगर शेख, आशपाक शेख, कलीम शेख, बाबुलाल पटेल, शरीफ बागवान, अमीर शेख, सलीम सय्यद, इस्माईल शेख आदी जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बातमी संकलन :-  रुपेश डोलारे , तुळजापूर 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top